इमारत बांधकामात हल्ली आरएमसी या संज्ञेचा वापर ऐकू येतो. आरएमसी म्हणजे रेडी मिक्स्ड कॉक्रिट. १० वर्षात या | काँक्रिटचा वापर खूप वाढला आहे. त्यापूर्वी सगळीकडे आणि अजूनही खूप ठिकाणी कॉक्रिटचे मिश्रण छोटया मिक्सरमध्ये बांधकामाचे जागीच बनवले जाते. यासाठी खडी, रेतीचे ढीग आणि सिमेंटच्या गोणींची थप्पीही मिक्सरजवळ लावावी लागते. मग खडी, रेती, सिमेंट मिक्सरच्या खालच्या डब्यात (हॉपर) भरले जाते व सगळे सुके मिश्रण फिरत्या मिक्सरमध्ये ओतले जाते. नंतर मिक्सरमध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकून मिश्रण २-३ मिनिटे फिरवून एकजीव केले जाते. त्यानंतर हे मिश्रण दुसऱ्या बाजूला ओतले जाते ते घमेल्याने किंवा ट्रॉलीने बांधकामावर वाहून नेले जाते. ही पद्धत आता मोठमोठया बांधकामावर वापरली जात नाही. या पद्धतीत बरेच गैरफायदे आहेत. मिश्रणाच्या घटकाचे प्रमाण कमी जास्त होऊन कॉंक्रिटची मजबुती अनिश्चित होऊ शकते. त्याशिवाय बांधकामाच्या जागी खडी आणि रेतीसाठी मोठी जागा व्यापली तर जातेच आणि रेती आणि खडी जमिनीवर टाकल्याने मातीत मिसळली जाऊन थोडी वायाही जाते.
आता जुन्या पद्धतीची जागा घेतली आरएमसीने आहे. कॉक्रिटचे तयार मिश्रण बनवून ते विकण्याची सोय झाली आहे. त्यासाठी काँक्रिट मिक्सिग फ्लॅट एका ठिकाणी प्रस्थापित करता येतात. तेथे हव्या त्या ताकदीचे काँक्रिट संपूर्ण स्वयंचलित पद्धतीने बनवता येते. काँक्रिट, काँक्रिट-वाहक ट्रकमधून बांधकामाच्या जागेपर्यंत नेतात. रस्त्यातून आपण कॉंक्रिटची तिरकी फिरकी टाकी बसविलेले ट्रक पाहतो. काँक्रिट सुकून घट्ट होऊ नये म्हणून ही टाकी सतत फिरती ठेवावी लागते. ट्रकला १५ मिनिटापेक्षा अधिक लांबचा प्रवास करायचा असेल तर टाकीत सुके मिश्रण भरलेले असते. व सोबत पाण्याची वेगळी टाकी नेली जाते. बांधकामाचे ठिकाण जवळ आले की, पाणी मिश्रणात सोडले जाते. बांधकामाच्या ठिकाणावर पोहोचेपर्यंत कॉक्रिट मिक्स तयार होते. हे आरएमसी कॉंक्रिट उत्तम दर्जाचे असते. बांधकाम व्यवसायात तंत्रज्ञानाची खूप प्रगती झाली आहे परंतु हा व्यवसाय आता अशिक्षित ठेकेदार आणि पैसेवाल्यांच्या हाती गेला असल्याने कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष न देता लवकर पैसा मिळवण्याचे उद्दीष्ट गाठले जाते. यामुळे वरील दोष सर्रास दिसून येतात.
Leave a Reply