नवीन लेखन...

Whatsaap status बद्दल काही

नमस्कार मंडळी. कसे आहात ? आज मी आपल्या समोर घेऊन आलोय एक आगळा वेगळा विषय. मित्रहो, व्हॉटसअप बद्दल तर तुम्ही जाणून असलाच. तसे पाहता व्हॉटसअप आजकल सगळेच वापरतात. तर त्यामध्येच एक वैशिष्ट्य म्हणजे व्हॉटसअप स्टेटस.

या जगातला प्रत्येक व्यक्ती व्हॉटसअप स्टेटस स्वतःच्या पद्धतीने वापरत असतो.  जसे एखादा नाराज असलेला व्यक्ती आपले दुःख त्याला कोणाला सांगायचे असेल तर तो इंटरनेट वर जाऊन त्याचा दुःखाचा संबंधित फोटोज् स्टेटस वर टाकतो. त्यातून त्या व्यक्ती अनेक अर्थ त्याचा ओळखीच्यांना सांगायचे असतात.  त्यात अनेक प्रकार आहेत. जसे कोणाचे प्रेम संबंध मध्ये भांडण झाले असेल तर त्याचा लगेच आजकल चे मुल मुली व्हॉटसअप स्टेटस वर त्या संबंधित लिहितात किंवा नाराजीचा emoji टाकतात.

WhatsApp status मध्ये काही झण आपला आनंद पण शेअर करतात.  जसे एखाद्याच्या घरात कोणी परीक्षेत पास झाले , कोणाच्या घरात एखाद्याचे लग्न ठरले किंवा नोकरी मध्ये पदोन्नती झाली  असेल तर असे अनेक आनंदाचे क्षण असतात तेव्हा लोक ते क्षण सगळ्यांसोबत साजरे करायच्या हेतूने स्टेटस वर शेअर करतात.  पण आपल्या समाजात काही लोक या आनंदाच्या स्टेटस शेअरिंग ला वेगळ्या अर्थाने जाणूनबुजून बघतात जसे इतरांना कमी लेखण्यासाठी या व्यक्ती ने हा व्हॉट्सअँप स्टेटस ठेवलेला आहे असे समजतात तर काही लोक असे पण आहेत की त्या आनंदात सहभागी होऊन आशीर्वाद देतात आणि आनंद व्यक्त करतात.

WhatsApp status चा आजुन एक महत्वाचा उपयोग म्हणजे जाहिरात करणे.  लोकांपर्यंत नोकरी संदर्भात , खरेदी विक्री संदर्भात , माहिती संदर्भात काही जाहिरात पोहोचवायची असेल तर याचा उपयोग केला जातो.

WhatsApp status बद्दल लोकांचे काही प्रकार आहेत आणि त्यांचे काही विचार पण आहेत ते कसे बघुया. अशे काही लोक आहेत की जे आनंदाचे क्षण स्वतःच्या भ्रमणध्वनी मध्ये टिपतात पण व्हॉटसअप स्टेटस वर ठेवत नाही , का नाही ठेवत असे विचारले असता त्यांचे उत्तर जगावेगळे च असते. तर काही लोक स्वतःच्या जीवनातले छोटे छोटे टिपलेले क्षण चित्र पण स्टेटस वर ठेवतात आणि जगा सोबत आनंद साजरा करतात.  जे लोक आनंदाचे क्षण साजरा करतात त्यांचा बद्दल शेअर न करणाऱ्या लोकांचे विचार फारसे चांगले नसतात जसे आम्हाला शो ऑफ करण्याची गरज नाही, आम्हाला ती आवड नाही असे विविध उत्तर तयार असतात.

बरेच लोक स्टेटस या साठी पण ठेवत नाही की आनंदी क्षणांचे पारिवारिक फोटोज् ठेवले तर इतरांची कळत नकळत का होईना पण नजर नको लागायला. असा समज असल्या कारणाने. या सगळ्या गोष्टी करता असो अथवा नसो प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन आपल्याला whatsapp status बाबतीत बघायला मिळतो.

पण खरे पाहता असे नाही. WhatsApp status ठेवणे हा प्रत्येकाच्या आवडी निवडी चा भाग असतो. त्याला कोणीच तोलू शकत नाही.  मित्रहो काही व्यक्ती अशे पण आहेत की ज्यांनी whatsapp status च्या माध्यमातून अनेक लोकांचे प्राण वाचविले आहेत. जसे बरेचदा दवाखान्यात रक्त हवे असल्यास त्याचा ब्लड ग्रुप बद्दल स्टेटस शेअर करतात आणि त्याला सोप्या पद्धतीने कमी वेळात त्या बद्दल माहिती उपलब्ध झालेली असते.

WhatsApp status मध्ये महत्त्वाचे म्हणजे अजून एक गोष्ट आहे ती अशी की प्रेरणा देणारे विचार. एका व्यक्ती ने जर प्रेरणा दायी विचार ठेवला असेल स्टेटस वर तर अनेक  खचलेल्या लोकांना ते स्टेटस वाचून प्रेरणा मिळते काळात नकळत पणे का होईना पण तो एखाद्यामुळे कोणाला तरी नकळत पणें फायदा होतो आणि तो ते वाचून चांगले पाऊल उचलण्याचे ठरवतो असे पण वास्तविक जीवनात घडत असते.

स्टेटस मुळे अनेक प्रकारचे सामाजिक, ज्ञानात्मक, प्रेरणादायी असे स्टेटस पण आपल्याला बघायला मिळतात.  स्टेटस  ठेवणाऱ्या लोकांमध्ये शुभ सकाळ, शुभ रात्री  आणि सणवार बद्दल पण स्टेटस असतात जेणे करून आनंद हा द्विगुणित करता येतो.

माझ्या मते whatsapp वर कोणच्याही प्रकार चा स्टेटस ठेवणे म्हणजे तो व्यक्ती रिकामा आहे ,  त्या व्यक्ती ला समाज नाही किंवा तो व्यक्ती स्वतःचा मोठेपणा दाखवतो असे अजिबात नाही तर तो व्यक्ती मग तो कोणी पण असो समाजसेवक, राजकारणी, नोकरी करणारा , एखादा व्यापारी कोणी पण असो तो स्वतःचा आनंद, स्वतःचे ज्ञान, स्वतःचे दुःख , त्याचा जवळ असलेली माहिती, स्वतःचे विचार द्विगुणित करून त्याचा प्रेमाच्या लोकं समोर मांडण्याचा तसेच सांगण्याचा या माध्यमातून प्रयत्न करत असतो हे लक्षात ठेवा मित्रहो.

WhatsApp status हे अतिशय चांगले माध्यम आहे त्याचे अशेच अनेक गमितिशिर आणि छान गोष्टी आहेत. शेवटी मित्रहो एकच सांगतो कोणी जर व्हॉटसअप स्टेटस ठेवलेला असेल मग तो कशाचा पण संबंधित असो आपण त्यातून त्या व्यक्ती बद्दल सकारात्मक भुमिकाच घेतली पाहिजे.

निनाद चंद्रकांत देशपांडे

अमरावती,

९९२२६१३००१.

Avatar
About निनाद चंद्रकांत देशपांडे 9 Articles
माझ्या बद्दल माझे लेख च आपल्याला सांगतील....
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..