नवीन लेखन...

साठे खत/खरेदी खत कधी करतात?

घराच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना सुद्धा आपल्या मालमत्तेची कागदपत्रे इंटरनेट, सोशल मिडिया किंवा आपल्या परिचित व्यक्तींकडून घेतलेल्या कागदपत्रात थोडेफार फेरफार करून पैसे वाचवल्याचं आनंद हा तात्पुरता न राहण्यासाठी कायदेतज्ञांकडून करणे हे नेहमीच भविष्याच्या दृष्टीने चांगले असते. कारण प्रत्येक करार त्यातील अटी ह्या वेगळ्या असतात. अन्यथा तुमची छोटीशी निष्काळजी पुढे महागात पडू शकते.

प्रश्न क्र. ७२) साठे खत (Agreement for Sale) आणि खरेदीखत (Sale Deed) यात महत्वाचे फरक काय आहे?

उत्तर: साठे खत अस्तित्वात नसलेल्या मालमत्तेबाबत किंवा अंशत: अदा केलेल्या किमतीच्या बदल्यात केले जाते. तर खरेदीखत हे फक्त अस्तित्वातील मालमत्तेचे तसेच पूर्ण किमत अदा करत असल्यास केले जाते.

साठे खत ज्या व्यक्तींमध्ये होतो त्यांनाच ठरलेल्या अटी मान्य असतात. परंतु हे मालमत्तेचे हस्तांतरण नव्हे. त्यामुळे कोणतेच हक्क प्रदान होत नाहीत. तर खरेदीखत हे नोदणीकृत असल्याने जगाला मान्य असते. प्रत्यक्ष हस्तांतरण असते. सर्व हक्क प्रदान होतात. त्यामुळे नुसत्या साठेकारारावर न थाबता खरेदीखत अवश्य करून घ्यावे. तेव्हाच मालमत्ता टायटल पूर्णपणे मिळते व रेव्हेन्यु रेकोर्डला म्हणजेच रेकोर्ड ऑफ राईटस ला नाव नोदणी होते.

प्रश्न क्र. ७३) संस्थेत मालमत्ता विकत घेण्याआधी संस्थेची परवानगी घेणे गरजेचे आहे का?

उत्तर: होय. गरजेचे आहे. (परंतु बंधनकारक नाही) जेणेकरून थकबाकी, लोन व इतर बाबी माहीत होण्यास मदत होते. अनेकदा मालमत्तेचे व्यवहार हे कोणालाही न कळवता, घाईघाइने, कमी मोबदल्यात मिळतोय, तेव्हा न वाचता हस्ताक्षर करताना विचार करणे गरजेचे असते.

प्रश्न क्र. ७४) साठेखत केल्यानंतर खरेदीखत करताना परत मुद्रांक शुल्क भरावे लागते का?

उत्तर: साठेखातात मालमत्ता घेणार/विकणार यांच्यामध्ये ठरलेल्या अटी व शर्तीप्रमाणे मोबदला पूर्ण ठरलेल्या कालावधीत देण्यात आल्यानंतर खरेदीखत केले जाते. साठेकारार करताना पूर्ण मोबादाल्याबर मुद्रांक शुल्क भरलेले असल्याने पुन: मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही.

प्रश्न क्र. ७५) साठेखत केले स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला परंतु खरेदीखत केले नाही/ नोदणी केली नाही तर सदर मिळकतीची मालकी कोणाकडे रहाते?

उत्तर: साठेखत करून स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला परंतु खरेदीखत केले नाही म्हणजेच भारतीय नोंदणी कायद्यानुसार नोदणी न केल्यास सदर मिळकतीची मालकी नोंदणी करेपर्यंत विकासकाकडे रहाते. खरेदीदाराला निव्वळ करार केला म्हणून अशा मिळकतीची बाबत, कोणताही बोझा किंवा हितसंबध निर्माण होत नाहीत तसेच हक्क ही मिळत नाहीत.

– अ‍ॅड. विशाल लांजेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..