नवीन लेखन...

भूकंपरोधक वास्तूरचनेबाबत मार्गदर्शन कोठे मिळेल?

अलीकडच्या काळात भूकंप अभियांत्रिकी हा एक वेगळाच विषय अभ्यासला जात आहे. जगात अनेक विश्वविद्यालयातून भूकंप अभियांत्रिकी या विषयावर अभ्यास, प्रयोग आणि संशोधन सुरू आहे. अमेरिका, जपान, न्यूझीलंड या देशात अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये अनेक प्रयोग व मॉडेल परीक्षा केली जात आहेत.

तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळा घेतल्या जातात. त्यात जगातील तज्ज्ञ आपले संशोधन सादर करीत असतात. अनेक संदर्भ ग्रंथ, शोध निबंध, पुस्तके पण उपलब्ध आहेत. अर्थक्वेक इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, यूएसए (इइआरआय), इंटरनॅशनल असोसिएशन फॉर अर्थक्वेक इंजिनिअरिंग (आयइइ), टोकिओ या संस्था या विषयावर मोठे कार्य करीत आहेत. भारतात आय आय टी रूरकी मधील तज्ज्ञ डॉक्टर ए. एस. आर्या यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावरील भारतीय मानकाची, आय एस १८९३, निर्मिती झाली. तसेच आय एस ४३२६, आय एस १३८२८, आय एस १३९२० ही मानके पण उपलब्ध आहेत. आय आय टी कानपूरमधील निष्णात स्थापत्य अभियांत्रिकीतील तज्ज्ञांच्या पुढाकाराने एनाआयसीइइ (नॅशनल इन्फर्मेशन सेंटर फॉर अर्थक्वेक इंजिनिअरिंग) ही संस्था १९९९ मध्य स्थापन झाली. यांनी या विषयावरील अनेक दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण प्रकाशने काढली आहेत. २००१ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या भूकंपानंतर स्ट्रक्चरल इंजिनिअर्स फोरम ऑफ इंडिया (एसीएफाआय) या इंटरनेट वरील चर्चा मंडळाची सुरूवात झाली. याचे १०,००० पेक्षा जास्त सभासद असून अनेक तज्ज्ञ यात आपली मते मांडत असतात.

मुंबईत इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स (आयएसएसइ) ही संस्था, १९९९ पासून, अभियंत्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत असते. इमारतीचे आरेखन करणारी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत ज्यात भूकंपरोधक आरेखनाचा अंतर्भाव केलेला आहे. यात STAADPro हे सॉफवेअर सर्वात लोकप्रिय आहे. भूकंप या विषयाचा अंतर्भाव अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात होणे अतिशय गरजेचे आहे. तसेच या बद्दल जनजागृती होणेही खूप महत्वाचे आहे. तरच भविष्यात होणाऱ्या भूकंपाला आपण समर्थपणे तोंड देऊ शकू.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..