योनीमार्गे होणारा अतिरिक्त पांढरा स्त्राव हा अनेकदा स्त्रियांना त्रासदायक वाटतो. सतत योनीमार्गे होणारा हा स्राव नेहमीच्या नैसर्गिक | स्त्रावापेक्षा अधिक प्रमाणात होतो. अशा निरुपद्रवी स्त्रावाबद्दल अधिक माहिती घेऊ.. अशा वेळी जननेंद्रियाच्या ‘भग’ (व्हलवा) भागात सतत ओलावा राहणे व कपड्यांवर पांढरट पिवळसर डाग पडणे ही प्रमुख लक्षणे असतात. या स्रावामुळे कधी खाज येत नाही, स्राव पूयुक्त नसतो किंवा कधी दुर्गंधी येत नाही. शरीरातील इस्ट्रोजेन या संप्रेरकाच्या. वाढलेल्या स्रावामुळे योनीमार्ग व ग्रीवा यात साधारणतः वास्तव्य असलेल्या निरुपद्रवी जिवाणूंवर होणाऱ्या परिणामांमुळे हा स्राव काळ, येण्यापूर्वी, वाढतो. तारुण्यागम वयात, बीजोत्सर्गाचा मासिकपाळी – गरोदरपणात किंवा लैंगिक उद्दीपन झाल्यास हा स्त्राव वाढू शकतो. क्वचित प्रसंगी बारथोलीन ग्रंथीमधून असा स्राव होऊ शकतो. या सर्व कारणांमुळे होणारा स्राव निरुपद्रवी असतो. कधीकधी नुकत्याच जन्मलेल्या अर्भकांमध्ये हा स्राव होतो.
गर्भधारणाविरोधी गोळ्या घेताना हा उपद्रव झाल्यास त्वरित गोळ्या बंद कराव्यात. ठराविक प्रतिजैविके (अॅण्टिबायोटिक्स) घेतल्याने हा त्रास होऊ शकतो. मधुमेहाच्या रोग्यात हे प्रमाण अधिक दिसते. योनीमार्गे वापरली जाणारी संततिनियमनाची त उपकरणे किंवा योनीमार्गे इ मासिकपाळी वेळी वापरले जाणारे टॅम्पून्स हेही एक कारण असू शकते. या सर्व कारणांवर उपाय म्हणजे वैयक्तिक स्वच्छता फार महत्त्वाची आहे. कधी उतारवयात नैसर्गिक संप्रेरकांच्या कमतरतेमुळे नैसर्गिक जिवाणूंची बेसुमार वाढ होऊन हा त्रास होतो. कारण काहीही असो, त्याची शहानिशा तज्ज्ञांकडून करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. श्वेतप्रदराची कारणे
गंभीर असू शकतात. त्यावर तातडीने इलाज करण्याशिवाय गत्यंतर नसते. गर्भाशयाच्या
ग्रीवामुखावर जखम होणे, बहुशुंडक (पॉलिप) होणे, अशा परिस्थितीत वेळेवर उपाय न झाल्यास कॅन्सरसारख्या भस्मासूराला आमंत्रण दिल्यासारखे होईल.
डॉ. विनोदिनी प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply