नवीन लेखन...

WHO …!

तरुणांचे मानसिक आरोग्य सांभाळा….

आज जागतिक मानसिक आरोग्य दिन !
या वर्षा साठी WHO ने थीम दिलीय ते बदलत्या जगात तरुणांचे मानसिक आरोग्य …..

या जगात शाश्वत फक्त ‘बदल’ आहे. कधी तो खूप हळू असतो तर कधी खूप जोरात. इंटरनेट च्या भन्नाट क्रांती ने हल्ली जग भयंकर वेगाने बदलत आहे. 6 महिन्यांपूर्वी नवल असलेली गोष्ट आजच out dated होते आहे. या बदलत्या जगात या वर्षी WHO ने दखल घेतली आहे ती तरुणांची….

आजची तरुण पिढी गृहीत धरली आहे ती वयवर्षं 14 ते 29. मुळात या वयात जग बदलू अथवा न बदलू पण त्यांच्या अंतर्गत मनपटला वर त्यांचं स्वतःच सारं विश्वच बदलत असतं. शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरे होतात ती नेमकी याच वयात. अंतर्गत सोबत बाह्यजग देखील झपाट्याने बदलत असेल तर त्यांना तो वेग साधावाच लागतो. नाहीतर मागे पडतात मग गर्तेत जातात…..

तरुण म्हणजे घराचे आणि राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ! या स्थंभा चा पायच कमजोर राहिला तर तो इतरांना सोडा, स्वतःला देखील आधार देऊ शकत नाही. कधी ते व्यसनांच्या जाळ्यात अडकतात तर कधी आत्महत्या करतात. वाममार्गाला जाऊन स्वहस्ते स्वआयुष्याला तिलांजली देतात.

WHO ने दिलेली वयोमर्यादा पाहता, 30शी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कळत नकळत पालकत्व येतं. मग त्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं. राहिलं आजूबाजूच्या, कामाच्या ठिकाणच्या किंवा समोर दिसणाऱ्या पण किमान आपापल्या Friend List मधील जे तरुण आहेत त्यांची काळजी घेणं तर आपल्याला शक्य आहे न? हात पुढे करा, कुणीतरी गरजवंत नक्की पकडेल !
करून तर बघा, तुम्हाला स्वतःला स्वतःचे मोठेपण जाणवेल. तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. एक वेगळं समाधान लाभेल…..

तळ टीप :- 70/80 विषयावर हलक्या फुलक्या पोस्ट लिहिल्या नंतर आज एका जड विषयावर, जड भाषेत भाष्य करण्याचे कारण, सर्व FB परिवाराला समजावे की,
मी हुशार आणि बुद्धिजीवी वग्रे सुद्धा आहे.
अधून मधून अशी वैचारिक पोस्ट टाकली तर त्या लोकांना “साहित्यिक” म्हणून मान्यता देखील मिळते, म्हणे…

विनोद डावरे, परभणी.

##सहजच सुचलं – 81

विनोद डावरे
About विनोद डावरे 14 Articles
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..