नवीन लेखन...

यशस्वी लोक हे नेहमीच यशस्वी का असतात

मायकल जॉर्डन, थॉमस एडीसन, एलनॉर रूझवेल्ट आणि हेन्री फोर्ड अशी आणि इतर यशस्वी लोक यांच्यात काय गोष्टी आहेत ज्या त्यांना जेहमीच यश मिळवून देतात. त्या गोष्टी जर आपल्याला देखील माहीत झाल्या तर आपणही त्यांच्या प्रमाणे खात्रीलायक यश मिळवू शकतो. खालील गोष्टी या त्यातलाच काही आहेत असे आपण म्हणू शकतो.

१ ते निर्णय घेतात आणि कृती करतात.

चूक किंवा बरोबर, ते कृती करतात. कुठलाही निर्णय न घेण्यापेक्षा आणि कृतीत करण्यापेक्षा हे केव्हाही चांगले. जसं फॅकलीन रूझवेल्ट म्हणतोः एखाद्या पद्धतीचा अवलंब करून बघणं ही साधी सोपी गोष्ट ओ. जर ती चुकीची ठरली तर विचा स्विाकर करा आणि दुसरी वापरून बघा. पण महत्त्वाचं म्हणजे काहीतरी करून बघणं महत्त्वाचं

२ एखादी गोष्ट करावीशी वाटत नसेल तरी ते करतात.

मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्यातील बरेच जण एखादी गोष्ट करावीशी वाटत नसेल तर माघार घेतात. पण यशस्वी लोक तसं करत नाही. आणि हीच गोष्ट काही कालांतराने फरक करणारी ठरते.

३ ते अतिमहत्त्वाच्या गोष्टी पहील्यांदा करतात.

यशस्वी लोक उपयोगाच्या पण अतिमहत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ घालवत नाहीत. ते विचार करून कामाचे नियोजन करतात. आणि आपला जास्तीत जास्त वेळ महत्त्वाच्या कामांमध्येच गुंतवतात.

४ ते एका वेळेस एकच गोष्ट करतात.

अनेक काम एका वेळेस करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडतो आणि वेळ वाया जातो त्याऐवजी ते एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करून ती पूर्ण करतात आणि मगच दुसरी गोष्ट हातात घेतात. एकाच गोष्टीवर १०० फोकस केल्याने ती गोष्ट चांगल्यारितीने जलद पूर्ण होते.

५ त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो.

नकारात्मक दृष्टिकोन आपल्यासाठी घातक आणि बंधनकारक आहे. सकारात्मक दृष्टीकोनाने आपल्या मताची कवाडं नेहमीच उघडी राहतात ज्यात नवीन कल्पना प्रवेश करू शकतात. नाते संबंध चांगले राहण्यासाठी आणि नवीन नाती जोडण्यासाठीही याचा खूप उपयोग होतो. ज्या गोष्टीत एखाटयाला अडचणी दिसतात तिथे यशस्वी माणसाला संधी दिसतात.

६ त्यांची अपयशाबद्दलची संकल्पना सकारात्मक असते.

बरेच लोक अपयश आल्यावर प्रयत्न करणं सोडून देतात किंवा एखादी दुसरी गोष्ट करण्याची एक चिन्ह आहे असं समजातात. त्याच जागी यशस्वी लोक अपयशाकडे अनुभव म्हणून पाहतात. त्यांना अपयशी होणं आवडत नाही पण ते त्याला घाबरत देखील नाहीत.

७ अपयशाची भिती त्यांना रोखत नाही.

ते त्या भितीवर मात करतात. भिती म्हणजे अशी गोष्ट जी वास्तव असल्याचा भास होतो. भितीच्या मागील कारणे शोधून मनाला त्याचा फोलपणा दाखवून दिला तर भिती एकतर कमी होते किंवा तिचा समूळ नाश होतो.

८ त्यांनी त्यांच्या आयुष्याचं कारण शोधलेलं असतं

यशस्वी लोकांनी त्यांना त्यांच्रूा आयुष्यात काय करायचं हे स्पष्ट ठाऊक असतं. हे कारणच त्यांना नेहमी प्रेरीत ठेवतं. त्यांच्यातील उत्साहाचं आणि अविरत उर्जेचा हाच स्त्रोत आहे.

९ ते विचलीत होत नाहीत.

यशस्वी लोक हे नेहमी महत्त्वाच्या गोष्टींवरच लक्ष केंद्रीत करतात. ते त्यांच्या वेळेला खुप महत्त्व देतात आणि त्याप्रमाणे नियोजन करतात. 

१० त्यांच्याकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असतात

आयुष्यात बऱ्याच गोष्टी करताना लोकांची साथ लागते. त्यासाठी तुमच्याकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असणं गरजेचं आहे.

११ ते नेहमी शिकण्यासाठी वेळ काढतात.

ते नवीन विचार, सूचना, माहिती आणि बद्दल स्विकारण्यासाठी मन मोकळं ठेवतात. मला सर्व ठाऊक आहे, माझ्यासाठी नीवन शिकण्यासारखं काहीच नाही असा दृष्टीकोन आपल्या प्रगतीची मारक आहे.

संकलन – अमोल सातपुते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..