नवीन लेखन...

लग्नातल्या अक्षता तांदूळाच्याच का?

Why use Rice for Akshata?

आपण लग्नात अक्षता वापरतो. अक्षता फक्त तांदूळाच्याच बनवतात. दुसरे कोणतेही धान्य त्यासाठी वापरले जात नाही.

 याची खालील दोन महत्वाची कारणे-

तांदूळ हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही…त्याला आतून कीड पडत नाही…म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला  धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते !

दूसरे म्हणजे तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते…तेव्हा ते खरे बहरते…..! त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे….पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते….यासाठी म्हणूनही अक्षता मांगल्यरूपी ….असेच तिने बहरावे म्हणून वापरल्या जातात….

आपल्याकड़च्या प्रथा खूप विचारपूर्वक केलेल्या आहेत….

 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

2 Comments on लग्नातल्या अक्षता तांदूळाच्याच का?

  1. नमस्कार.
    अक्षतांच्या वापराबद्दल छान माहिती व विचार.
    – अक्षत म्हणजे ज्याची झीज झालेली नाहीं / होत नाहीं, असें, न तुटलेलें. तांदुळाला कीड लागत नाहीं , हें तुम्ही लिहिलेलें आहेच. तसेच, अक्षता या, अनब्रोकन ग्रेन्स, म्षणजेच न तुटलेल्या तांदूळदाण्यांच्याच असतात.
    – ज्याप्रामाणें तांदळाचें ट्रान्सप्लांटेशन होतें, त्याप्रमाणेंच मुलीचेंही होतें, हा सुंदर विचार आहे. ( मी माझ्या एक कवितेही हा विचार मांडलेला आहे. असो).
    – तांदूळ ( व यव म्हणजे बार्ली ) हे भारतातील पहिले डोमेस्टिकेटेड धान्य आहे ( म्हणजे जे आधी वाइल्ड धान्य होतें, व ज्याची हेतुत: लागवड सुरूं झाली ) . (ही गोष्ट वैदिक काळाच्याही आधीची आहे) . कदाचित त्यामुळेही, भारतातील लग्नसंस्कारांमध्ये तांदळाचें महत्व असावें.
    सुभाष नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..