सह्याद्रीमधील उत्तुंग शिखरे, खोल दऱ्या, उभे कडे, निबिड अरण्य, मुबलक पाऊस, आणि उबदार हवा यामुळे सजीवांच्या जगण्यासाठी, त्यांच्या निवासासाठी आणि वाढीसाठी पोषक असं वातावरण तयार होते. त्यामुळेच इथे खूप मोठे जैवविविधता आहे. सुमारे 9/10 हजार प्रकारच्या वनस्पती, 140 प्रकारचे सस्तन प्राणी, 500 च्यावर पक्षी, 200 च्या आसपास उभयचर प्राणी, आणि 6000 च्यावर कीटक प्रजातींची नोंद झाली आहे.
सह्याद्री हे मराठी माणसाच्या ह्रदयात कोरलेले नांव आहे. याची कारणं ही ऐतिहासिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि मुख्य म्हणजे आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेली आहेत. सह्याद्री आपल्याला अनेक गोष्टी देतो स्वच्छ हवा, वनोपज आणि पाणी या त्यापैकीच. महाराष्ट्रातील सर्व नद्या त्या पूर्व वाहिनी असोत की पश्चिमवाहिनी सह्याद्रीतच उगम पावतात आणि जवळपास सर्व दक्षिण भारताला पाणी पुरवतात.
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उगम पावणारी ही पर्वतरांग महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांमधून जाताना 1600 कि.मी. अंतर कापते. हीच पर्वतरांग केरळात समुद्राखाली जाऊन श्रीलंकेत प्रकट होते. ही पर्वतरांग उभा आडवा विस्तार मिळून सुमारे 16 लक्ष चौरस कि.मी.चा भाग व्यापते.
जगातील 10 Hotest Biodiversity Hotspots मध्ये या परिसराची निवड झाली आहे.
सह्याद्रीमधील वातावरण हे उष्णकटिबंधीय असते. येथील हवा वर्षभर उबदार आणि दमट असते. इथे साधारणपणे 9000 मि.मि.पर्यंत पाऊस दरवर्षी पडतो, परंतु पावसाचे हे प्रमाण सारखे नसते. विशेषतः महाराष्ट्रतील काही भागात सर्वात जास्त पाऊस केवळ तीन ते चार महिन्यात पडतो तर केरळमधील सह्य डोंगररांगामध्ये एवढाच पाऊस वर्षभरात पडतो.
मात्र जुलै-ऑगस्टमध्ये जवळजवळ सगळीकडेच प्रचंड पाऊस असतो. इथली उत्तुंग शिखरे, खोल दऱ्या, उभे कडे, निबिड अरण्य, मुबलक पाऊस, आणि उबदार हवा यामुळे सजीवांच्या जगण्यासाठी, त्यांच्या निवासासाठी आणि वाढीसाठी पोषक असं वातावरण तयार होते. त्यामुळेच इथे खूप मोठे जैवविविधता आहे. सुमारे 9/10 हजार प्रकारच्या वनस्पती, 140 प्रकारचे सस्तन प्राणी, 500 च्यावर पक्षी, 200 च्या आसपास उभयचर प्राणी, आणि 6000 च्यावर कीटक प्रजातींची नोंद झाली आहे. अजूनही नक्की किती प्रजातींची नोंद व्हायची आहे याची कल्पनाच नाही.
इथल्या एकूणच भौगोलिक परिस्थितीमुळे वनस्पतींची मोठी विविधता बघायला मिळते सदाहरीत जंगलांपासून पानगळीच्या शुष्क वनस्पती इथे आढळतात. अनेक दऱ्याखोऱ्यात आणि विस्तीर्ण पठारांवर छोटी छोटी गवताळ कुरणे आणि झुडूपे उगवतात. अशा अनेक पठारांवर पाऊसकाळात फुलणाऱ्या गवतफुलांचे अगणित गालीचेच पसरतात. अशा असंख्य Valley of Flowers सह्याद्री आपल्या अंगाखांद्यावर मिरवतो.
झाडांवर वाढणाऱ्या आणि अतिशय मौल्यवान अशा Orchids च्यासुमारे 300 पेक्षा जास्त प्रजाती आढळल्या आहेत सीतेची वेणी हे त्यापैकीच एक.
इथल्या पश्चिमवाहिनी नद्या या कमी लांबीच्या आहेत, डोंगर उतारामुळे पाण्याला प्रचंड वेग असतो, उगमापासून समुद्राला जाऊन मिळेपर्यंतच्या प्रवासात या नद्या तीरावरील भागाला डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी पुरवतात. पुढे त्यातील पाणी कमी झाल्यामुळे हा परिसर कोरडा पडतो, त्यामुळे पावसाळ्यात प्रचंड ओलावा आणि उन्हाळ्यात कोरडेपणा इथल्या वातावरणात असतो. अशा विविध गुणांच्या वातावरणात बहरणारे सजीव जग सुध्दा विविधांगीच असल्यास नवल ते काय.
सह्याद्रीमध्ये सस्तन प्राण्यांच्या सुमारे 140 प्रजाती आढळतात. त्यातल्या 15 या पूर्णपणे स्थानिक म्हणजे फक्त सह्याद्रीमध्येच आढळणाऱ्या आहेत. यात मुख्यत्वे शेकरू, निलगिरी थार इत्यादींचा समावेश होतो.
सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 227 प्रजाती नोंदवल्या गेल्या असून स्थानिक सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या खूप मोठी आहे यात चरश्ररलरी Malabar pit viper, stripped coral snake विविध प्रकारच्या पाली यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी यांच्यावरील संशोधन मोठ्या प्रमाणात सुरू असून नवनवीन प्रजातींची नोंद होते आहे.
उभयचर प्राण्यांच्या जवळपास 180 प्रजातींचा वावर इथे आहे यापैकी जवळपास 80 टक्के प्रजाती या स्थानिक आहेत, बेडकांच्या अनेक नवनवीन प्रजातींची नोंद होते आहे.
सह्याद्रीतल्या प्रचंड पर्जन्यमानामुळे आणि इथल्या दमट वातावरणामुळे मृदुकाय प्राणी म्हणजेच शंख किंवा गोगलगायी आणि शिंपले मोठ्या प्रमाणात सापडतात. जवळजवळ 80 प्रकारच्या गोगलगायी इथे सापडतात. त्यापैकी 25 स्थानिक आहेत, वास्तविक हा आकडा अजून बराच वाढू शकतो.
या भागात पक्ष्यांच्या पाचशेच्या वर प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. या पाचशे पैकी 16 प्रजाती या स्थानिक आहेत यात Nilgiri pigeon, Malabar grey hornbill, crimson backed sunbird वगैरे पक्षी येतात.
कीटकांच्या प्रजातींची एकूणच जीवसृष्टीमधील संख्या मोठी असून सह्याद्रीमधील कीटकांचा अभ्यास अजूनही म्हणावा तितका झालेला नाही, कीटकांपैकी पतंगाच्या अगणित प्रजाती आहेत.
डोळ्याला सुखावणारी आणि निसर्गामध्ये महत्त्वाचा भाग असणारी फुलपाखरे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये विपुल प्रमाणात दिसतात.
फुलपाखरांच्या एकूण प्रजातींपैकी 313 प्रजाती सह्याद्री मधे सापडतात. यात भारतातील सर्वात लहान फूलपाखरू Grass Jewel आणि भारतातील सर्वात मोठे आणि तळकोकणात सापडणारे फूलपाखरू Southern birding यांचा तसेच महाराष्ट्राचे राज्य फूलपाखरू Blue Mormon चाही समावेश होतो.
या सर्व प्राणिजगतात भर पडते ती स्थलांतरीत पक्ष्यांची. शिवाय चातक, Indian Putta सारखे local migratory पक्षी म्हणजे या भागाची नवलाई आहे. नुसते पक्षीच नव्हे, तर अनेक प्राणी आणि अगदी फूलपाखरंसुध्दा स्थानिक स्थलांतर करताना आढळतात, हे स्थलांतर मुख्यतः उन्हाचा कडाका आणि मुसळधार पाऊस यापासून वाचण्यासाठी असतं.
हा निसर्गनिर्मित अमूल्य असा ठेवा आपल्याला जपायलाच हवा.
–उदय कोतवाल
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply