नवीन लेखन...

बाहेर खाणं रक्तदाबासाठी चांगले की वाईट?

Will eating out increase the risk of prehypertension

2006 सालापासून 17 में हा जागतिक रक्तदाब दिन (World Hypertension Day) म्हणून साजरा केला जातो. 2013 ते 2018 ह्या 5 वर्षांसाठी “Know Your Numbers” ही थीम राबविण्यात येत आहे. ह्याचा उद्देश आहे कि जगातील जास्तीतजास्त लोकांमध्ये हाइपरटेंशन बदल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत म्हणून हा जागतिक दिवस साजरा केला जातो. हाइपरटेंशन हा एक सायलेंट किलर आजार म्हणून ओळखला जातो. हाइपरटेंशन हे पुर्वी चाळीशी नंतर आढळायचे परंतु आता तर हे विशी तिशीच्या व्यक्तींमध्ये ही आढळू लागले आहे. लहानपणापासूनच सुरू झालेले हाइपरटेंशन काळजी न घेतल्यास पुढे जाऊन प्रौदावास्थेत ही तापदायक ठरू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून ह्रदय रोगामुळे होणार्‍या मृत्यू चा धोका निर्माण होऊ शकतो. प्रयोगात असे दिसून आले आहे कि 115/75 ह्या ब्लडप्रेशर पासूनच ह्रदय रोगाचा त्रास सुरू होऊ शकतो. जसजसे ब्लडप्रेशर वाढत जाते तसेतसे त्रासात ही भर पडत जाते. ज्यावेळी systolic ब्लडप्रेशर 120 – 139 mmHg असते आणि/किंवा diastolic ब्लडप्रेशर 80-89 mmHg असते त्या वेळी ते “प्रीहाइपरटेंशन” आहे असे संबोधले जाते. ज्या प्रमाणे हाइपरटेंशन असलेल्या व्यक्तीचा ह्रदय रोगाचा धोका वाढतो त्या प्रमाणे् प्रीहाइपरटेंशन असेल आशा व्यक्तीला ही ह्रदय रोगाचा धोका संभवतो. हाइपरटेंशन चे वर्गीकरण ठरवताना ब्लडप्रेशर हे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा मोजणे गरजेचं असतं. तसंच ते वेगवेगळ्या प्रसंगी कमीतकमी एक आठवड्याच्या अंतराने मोजणे महत्वाचे आहे. सध्या जगभरात हाइपरटेंशन आणि प्रीहाइपरटेंशन ह्या दोन्हीचे प्रमाणात वाढ होत आहे.

photo-1— साधारणतः 70 दशलक्ष (29%) प्रौढ अमेरिकन व्यक्ती हाइपरटेंशन ने त्रस्त आहेत.

— फक्त 52% हाइपरटेंशन व्यक्तिंचे ब्लडप्रेशर आटोक्यात आहे

— जवळपास 3 पैकी 1 अमेरिकन प्रीहाइपरटेंशन ने त्रस्त आहे

— 29.8% भारतीय व्यक्ती हाइपरटेंशन ने त्रस्त आहेत

— साधारणतः 42% शहरातील व्यक्ति आणि 25% ग्रामीण भागातील व्यक्तिंना त्यांच्या ब्लडप्रेशर विषयी माहिती नव्हती. ह्या व्यक्तींपैकी फक्त 38% शहरातील व्यक्ति आणि 25% ग्रामीण भागातील व्यक्तिच फक्त ब्लडप्रेशर साठी उपचार घेत होते आणि ह्या उपचार घेणाऱ्या व्यक्तिंपैकी दोन्ही भागात फक्त 1/5 रुग्णांचे ब्लडप्रेशर नियंत्रणात होते.

— जवळपास 3 पैकी 1 भारतीय व्यक्ती हाइपरटेंशन ने त्रस्त आहे.

— ब्लडप्रेशर हे बर्‍याचदा asymptotic असल्याने बर्‍याच व्यक्तींमध्ये ब्लडप्रेशर हे accidentally निर्देशित झाले आहे आणि ह्या मुळेच वाढलेले ब्लडप्रेशर हे दिर्घकाळ निदर्शनास येत नाही.

photo-2बाहेरच्या खाण्यात कॅलरीजचे प्रणाम, सॅच्युरेटेङ फॅटचे प्रमाण आणि मीठाचे प्रमाण घरच्या जेवणाच्या तुलनेत जास्त आढळते. अशी समजूत आहे की अशा प्रकारच्या खाण्याचा ब्लडप्रेशर वाढण्याशी संबंध आहे.

सिंगापुरच्या विद्यापीठातील 18 ते 40 ह्या वयोगटातील 501 विद्यार्थींचा समावेश ह्या प्रयोगात केला होता. ब्लडप्रेशर, BMI, आणि त्यांच्या जीवनशैली विषयी माहिती गोळा केली होती. जीवनशैलीत त्यांच्या शारिरीक व्यायाम, आणि बाहेरचे खाद्य पदार्थ आठवड्यातून किती वेळेस घेता ह्या विषयाची माहिती गोळा केली. ह्या सर्व माहिती चा प्रीहाइपरटेंशन व हाइपरटेंशनशी काही संबंध आहे का ह्या विषयी चाचपणी केली. ह्या सर्व माहिती चे संख्या शास्त्रीय पृथक्करणानुसार

— 27.4% विद्यार्थींना प्रीहाइपरटेंशन असल्याचे निदर्शनास आले.

— 49% पुरुष व 9% स्त्रीयाना प्रीहाइपरटेंशनचा त्रास आहे असे निष्पन्न झाले.

— 38% विद्यार्थी आठवड्यातून बारा वेळा खाण बाहेरून घेत होते असे ही आढळले.

— तसेच प्रीहाइपरटेंशन व हाइपरटेंशन असलेले विद्यार्थी हे प्रीहाइपरटेंशन व हाइपरटेंशन नसलेल्यांपेक्षा घरच्या खाण्या पेक्षा बाहेर चे खाण्याला जास्तीतजास्त प्राधान्य देताना दिसतात.

— प्रीहाइपरटेंशन व हाइपरटेंशन असलेल्या विद्यार्थींचा BMI जास्त होता. त्यांची शारीरिक हलचाल ही कमी होती आणि ते स्मोकिंग करत होते.

— 6% विद्यार्थींचा प्रीहाइपरटेंशनचा धोका तर आठवड्यातून फक्त एकदाच बाहेरच खाणं घेतल्यावर वाढलेला आढळला.

ह्या प्रयोगावरून असंच दिसतंय की बाहेरचे खाणे जरा विचार पूर्वक करायला हवे.

Avatar
About डॉ. शीतल म्हामुणकर 20 Articles
डॉक्टर शीतल म्हामुणकर ज्येष्ठ आहारतज्ज्ञ आहेत. त्या या क्षेत्रात ३० हून अधिक वर्षे कायरत असून क्रिडापटूंसाठी आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच काम केले आहे. डॉ. म्हामुणकर या प्रिव्हेंटा क्लिनिक या संस्थेच्या संचालिका आहेत. आहाराचे नियमन या विषयावर त्यांनी बरेच लिखाण केले आहे.

1 Comment on बाहेर खाणं रक्तदाबासाठी चांगले की वाईट?

  1. लेख अतिशय उत्तम . बाहेरच खाताना खरोखरच जाग्रुत रहायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..