नवीन लेखन...

विविध प्रकारच्या मुद्रण यंत्रांचे काम कसे चालते?

फाऊंड्रीमध्ये धातुंचे ओतकाम करताना ज्याप्रमाणे प्रथम पॅटर्न तयार करुन नंतर साचा करतात व त्यातून हजारो नग बनवतात. त्याप्रमाणे जे छापायचे त्याच्या प्रतिमेसाठी माध्यम तयार करुन त्याला छपाई यंत्रावर लावून हजारो प्रती छापता येतात.

इतिहासजमा झालेल्या रिलीफ छपाई पद्धतीतील लेटर प्रेसवर चित्रे आणि छायाचित्रांसाठी ब्लॉक्स आणि मजकूरासाठी खिळे वापरत. शिसे, टीन आणि अँटिमनी यांच्या विशिष्ट प्रमाणातील मिश्रणाला टाइप मेटल म्हणतात.

हे मिश्रण 600 अंश सेल्सिअस तापमानाला टाइपच्या साच्यात ओतले जात असे. या टाईपवर अक्षरे उलटी कोरली जात असत. हा अक्षरांचा टाईप जुळवणाऱ्यास जुळवणीदार (कम्पोझिटर) म्हणत. वर्तमानपत्राचे पान तयार करताना जुळविलेले पान आणि छायाचित्रांचे ब्लॉक्स त्या त्या जागेवर लावून ते पान शीट फेड यंत्रावरील एका पाटयावर बसविले जाई.

यंत्रावरील शाईच्या टाकीतून रबर रोलरमार्फत या जुळविलेल्या पानाला शाई लावली जाई. स्वयंचलित यंत्रामध्ये फिडरमधून कागद आपोआप उचलला जाऊन मोठया एका सिलेंडरभोवती गुंडाळला जायचा. सिलेंडरमुळे कागद टाइप व ब्लॉकवर दाबला जाऊन उलटया टाइपचा सुलटा ठसा कागदावर येत असे. छापलेले कागद दुसऱ्या बाजुला रचले जात. ब्लॉक बनविण्यासाठी जस्ताच्या पत्र्यावर प्रतिमेभोवतीचा भाग नायट्रिक ऍसिडने खाल्ला जात असे व त्यामुळे प्रतिमा वर येत असे. या छपाई यंत्राला ऍटोमॅटिक सिलेंडर मशीन म्हणत. लेटर प्रेसच्या रोटरी यंत्राला स्टिरिओ रोटरी यंत्र म्हणत.

जुळवलेल्या पानाचा ठसा शाई न लावता एका पुठ्यावर घेतला जाई. त्या पुठ्ठयावर टाइप मेटलचा रस ओतून अर्धा इंच जाड स्टिरिओ बनवित. हा अर्ध गोलाकार स्टिरिओ सिलेंडरभोवती बसवून शाईच्या टाकीतून रबर रोलरमार्फत थोडी थोडी शाई दिली जाई व रोलरमधून येणाऱ्या कागदावर छपाई होत असे. पुढे फोल्डर भागात दोन घडया घालून, कापून मोजण्याचे काम होई.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..