“सर,आज मै थोडा कन्फ्यूज्ड हूं !” मी एम.डीं ना म्हणालो.
” क्यूं ?”
“अपने एच.आर.मॅनेजरने एक असिस्टंट देने की रिक्वेस्ट डाली है .” मी माझे म्हणणे मांडले.
” हमारे यहां ‘पे रोल प्रोसेसिंग’ तो अकाऊंट्स डिपार्टमेंट करता है, फिर भी एच.आर. इतना बिझी ?”
” अब एच.आर.का वर्कलोड काफी बढा है. उसने एक टेबलमे, हर एक पाॅईंट लगनेवाला वक्त बताके जस्टीफाय किया है. मैंने डिसीजनके लिये एक हफ्ते की मोहलत मांगी है.”
” क्यूं ?”
” क्यूं की हेड ऑफिस और फॅक्टरीका स्टाफ बढाना नही ऐसा रिझोल्युशन पास हूवा है !” मी म्हणालो.
” फिर किसलिये रूके हो ? उसे बोल दो!”
” सर प्राॅब्लेम तो हमे ही साॅल्व्ह करना पडेगा!”
” ये बताओ अपने ऑफिसमे कौन कौनसे डिव्हीजन्स है?” एम.डीं.चा प्रश्न.
“अकाऊंट्स, मार्केटींग, प्राॅडक्शन प्लॅनिंग और एच.आर,” मी उत्तर दिले.
” तुम्हारी वर्कलोड थियरी क्या कहती है? सभी मॅनेजर्स की अकाऊंटेबीलीटी मिल रही है ना? “
मी होकारार्थी मान हलवली.
” मगर ये सब तूमने सिर्फ मॅनेजरीयल स्टाफके लिये किया.”
” येस.”
” मतलब उसके निचे काम करनेवाला स्टाफ अकाउंटेबल नही?” एम.डीं.नी प्रश्न विचारला.
” वो उनके मॅनेजरको अकाऊंटेबल है.” मी उत्तर दिले.
” तुम्हे ऐसा लगता है की ऑफिसके हर एमप्लाॅइ का वर्कलोड सही है ?”
” शायद हां!” मी चाचरत म्हणालो.
” व्हाॅट अ स्विट थिंकिंग!” एम.डीं.चा स्वर चेष्टेचा होता. ” मै तुम्हे एक सलाह देता हूं.”
” बोलीये सर.”
” तुम एक दिन मेरे केबिनमे पांच घंटे बैठो और केवल CCTV वाॅच करो.
” ???? ” माझी नजर प्रश्नार्थक.
” स्क्रीनपर तुम्हे हर व्यक्ति दिनभर क्या करती है वो मालूम पडेगा.”
“आय गाॅट इट. नो नीड टू सीट इन युवर केबिन.” एवढे बोलून मी उठलो आणि माझ्या केबिनमधे येवून बसलो. तिथून मी अकाऊंट्स मॅनेजरला मेल टाकला,” एक तासाच्या आत त्याच्या प्रत्येक असिस्टंटचे नाव आणि जाॅब डिस्क्रिप्शन मला हवे आहे.”
तासाभराने आलेल्या लिस्टमधे पहिलेच नाव मिसेस किर्थी पिल्लईंचे दिसले. तिचे जाॅब डिस्क्रिप्शन मी वाचू लागलो. कंपनीत गेली १६ वर्षे ती काम करत होती. तिने खालील कामे संगतवार दिली होती.
१) दर महिन्याच्या दहा तारखे पर्यंत चार लोकेशन्सच्या (तीन फॅक्टरीज आणि हेड ऑफिस) सर्व स्टाफचे सॅलरी कॅलक्यूलेशन आणि डिस्ट्रीब्यूशन.
२) स्टाफ आणि कामगारांचे पी.एफ कॅलक्यूलेशन करून ते तीन वेगवेगळ्या स्टेट्सच्या पी.एफ ऑफिसमधे भरणे.
३) स्टाफ आणि कामगारांचे प्रोफेशनल टॅक्स कॅलक्यूलेशन करून सरकारजमा करणे.
४) दर महिन्याच्या वीस तारखेला प्रत्येक कामगाराचा ॲडव्हान्स पे अगेन्स्ट सॅलरी त्यांच्या अकाऊंटमधे ट्रान्स्फर करणे.
५) क्वार्टरली परफॉर्मन्स रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशन.
६) इयरली बोनस कॅलक्यूलेशन ॲण्ड डिस्ट्रीब्यूशन.
मी इंटरकॉम वरून किर्थीला माझ्या केबिन मधे बोलावले. येताना तिला तिच्या जाॅब डिस्क्रिप्शनचा एक प्रिंट घेवून येण्यास सांगितले. पाच मिनीटात ती हजर झाली. मी बसण्याचा इशारा करताच ती बसली. तिच्या चेहर्यावर गोंधळलेले भाव होते. कारण यापूर्वी ती कधीही माझ्या केबिनमधे आली नव्हती.
” किर्थी मला तुझ्या जाॅब प्रोफाईलचे वर्कलोड कॅलक्यूलेशन करायचे आहे.” मी लगेच सुरवात केली. “आता मला तुझा पहिला पाॅईंट एक्सप्लेन कर.”
” म्हणजे नक्की काय सांगू मला कळत नाहीये.” किर्थी अस्खलित मराठीत बोलली.
“ठिक आहे, मी प्रश्न विचारतो, तू उत्तरे दे.”
किर्थीने मान डोलावली.” तिन्ही फॅक्टरीज कडून सॅलरी स्टेटमेंट्स किती तारखेला येतात?” मी पहिला प्रश्न विचारला.
” सात/आठ तारखेला.”
“आपल्या ऑफिसचे सॅलरी स्टेटमेंट किती तारखेला तयार होते?” माझा पुढचा प्रश्न.
” सर हे साॅफ्टवेअरवर बेस्ड आहे. ते फिंगर टच अटेंडन्स रेकाॅर्डरशी कनेक्टेड आहे.” किर्थीने सांगितले.
” म्हणजे अटेंडन्स रेकाॅर्ड सॅलरी शिटमधे ॲटोमॅटीकली अपडेट होतो?”
” होय सर.” किर्थीने सांगितले.
“बरं फॅक्टरी लेव्हलला हे रोज कोण अपडेट करतं?”
” तिथेही हे कोणीच अपडेट करत नाही. हेच साॅफ्टवेअर तिथे आहे.” किर्थीने सांगितले.
” म्हणजे दर महिन्याच्या सात तारखेला फॅक्टरी मागच्या महिन्याचे सॅलरी स्टेटमेंट व्हेरिफाय करून आपल्याला इ काॅपी पाठवत असणार ?”
“होय सर.”
“त्यानंतर तू काय करतेस?” मी विचारले.
किर्थी उत्साहाने सांगू लागली,
” फिल्टर लावून फक्त एमप्लाॅइ नंबर – एम्प्लाॅइ नेम – अर्न्ड सॅलरी – अकाऊंट नंबर ” असे चार काॅलमचे स्टेटमेंट बॅन्केला मेल करते. तिथून मग सॅलरी थेट इंडिव्हिज्युअल बॅन्क अकाऊंटला जमा होते.”
” चार लोकेशन्स साठी हे चार वेळा करावे लागत असेल.” मी खात्री करून घेण्यासाठी विचारले.
” होय सर.”
“असे एक स्टेटमेंट बनवून बॅन्केला पाठवण्यासाठी किती वेळ लागतो?”
” जास्तीत जास्त एक तास.” किर्थी उत्तरली.
” म्हणजे हे साधारण चार तासांचे काम आहे.”
” होय सर.”
“आता पी.एफ. कॅलक्यूलेशन संबंधी सांग.”
” सर पी.एफ.ची इंडिव्हिज्युअल आणि कन्साॅलिडेटेड फिगर सॅलरी स्टेटमेंट मधे आलेली असते. त्याचा फिल्टर लावून प्रिंट काढला जातो. मग चार लोकेशन्सचे चार चेक्स पी.एफ.ऑफिस साठी बनतात. ते आपल्या पी.एफ. कन्सल्टंटला भरण्यासाठी दिले जातात.”
” हे काम कोणत्या दिवशी केले जाते? आणि किती वेळ जातो?”
” अकरा/बारा तारखेला. हेही चार तासांचे काम आहे.” किर्थीने कन्फर्म केले.
” वेळेचा हाच फाॅरमॅट प्रोफेशनल टॅक्स आणि ॲडव्हान्स सॅलरी पेमेंट करताना लागत असेल.”
” होय सर.”
” वर्षातून चारदा ‘परफॉर्मन्स रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशन’आणि एकदा ‘बोनस’ डिस्ट्रीब्यूशन करण्यासाठी इतकाच वेळ लागत असेल असे मी समजू?” मी तिच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले.
” होय सर.”
” या व्यतिरिक्त अजून काही काम तू करतेस का?”
” नाही सर.”
” तू सांगितल्यानुसार दर महिन्यात १०,११,१२ आणि २० तारखेला तू चार चार तास बिझी असतेस, म्हणजे एकूण १६ तास. तसेच वर्षातून ४ वेळा म्हणजे १६ तास तू रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशनचे काम करतेस आणि एकदा ४ तास बोनस डिस्ट्रीब्यूशन साठीचे काम करतेस.”
पुढे मी विचारले,”किर्थी, दर दिवशी कामाचे लोडिंग हे तुझ्या ८ तासाच्या प्रेझन्स मधे ५.५० तासच असायला हवे हे तुला मान्य आहे का?”
” होय सर.”
” आता आपण वर्षाचे ३०० वर्किंग डेज् धरू. तूला ३०० x ५.५ = १६५० तास काम करणे अभिप्रेत आहे.”
” सध्याचे तुझ्यावरचे लोडिंग
१६ तास x १२ महीने = १९२ तास. अधिक १६ तास रिवाॅर्ड डिस्ट्रीब्यूशनचे, अधिक ४ तास बोनस डिस्ट्रीब्यूशनचे. म्हणजे एकूण २१२ तास कामाचा लोड तुझ्यावर आहे. जो (२१२÷१६५०)x१००, जेमतेम १३ टक्के आहे.
” आता उरलेला ८७ टक्के वेळ हा तुला ॲडीशनल वर्कलोड घेवून पुरा करावा लागेल.”
” सर मी एवढेच काम सोळा वर्षे करते आहे.आठ वर्षांपूर्वी पर्यंत सर्व मॅन्युअल वर्क होते. तेव्हा मान वर करायला फुरसत नसे.आता ऑटोमेशन झाल्यामुळे प्रोफाईल लहान वाटू लागली आहे. मला आता आणखी काम झेपेल असे वाटत नाही.”
” किर्थी, करीअर हा एक प्रवास आहे जो सतत चालू असतो. ज्यात आपण पुढे जात असतो. कोणतीही पोस्ट हे डेस्टीनेशन नाही.”
” सर, तरीही मला ॲडीशनल वर्कलोड झेपेल असे वाटत नाही.”
” किर्थी तुला काही चाॅइस नाही. दोन दिवस विचार कर आणि ‘यस’ किंवा ‘क्विट’ चा मेल पाठव!”
” किर्थी निघून गेल्यावर मी तिच्या मॅनेजरला आजचा अहवाल पाठवला आणि ह्या पद्धतीने उरलेल्या स्टाफचा वर्कलोड कॅलक्यूलेट करून आठवड्याभरात रिपोर्ट करण्यास सांगितले.
यावरून मॅनेजर्स आपल्या स्टाफचा खरा वर्कलोड किती आहे हे टाॅप मॅनेजमेंट समोर आणायला कसे उदासीन असतात हेही दिसले.
त्या मेल मधे मी एम.डीं. ना मार्क करायला विसरलो नाही कारण त्यांचे अनुमान बरोबर निघाले होते !
–रविकिरण संत
Leave a Reply