भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन देशभर ‘दहशतवाद विरोधी दिवस’ म्हणून पाळण्यात येतो. सद्य स्थितीत देशात वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद पसरलेला आहे. माणूस हा जन्माने स्वतंत्र असतो. आणि कोणताही माणूस हा आपले स्वांतत्र्य सोडावयास तयार नसतो. शास्त्र आणि कलेच्या वृध्दिमुळे माणूस भ्रष्ट आणि अनौतिक बनला असे रुसो म्हणतो. आणि या निष्कर्षातच दहशतवादाचे मूळ सापडते. दहशतवाद हा शब्द उच्चारायला जरी वेगळा वाटत असला तरी याचे नेतृत्व करणारे लोक हे अशिक्षीत नसून उच्चशिक्षीत असतात. अशा नेतृत्वावर श्रध्दा ठेऊन विध्वंसक लोक त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. ‘लोकशाहीची विरोधी बाजू म्हणजे दहशतवाद होय.’ त्यामुळे दहशतवाद हा लोकशाही शासनव्यवस्थेत अडथळे निर्मान करतो.
सामाजिक असंतुलन हे दहशतवादाचे मुळ आहे. सत्तेची हाव, अधिकार नाकारणे, स्वत:च्या फायद्यासाठी दुसज्याला ओलीस ठेवणे, धर्मसत्ता लादणे, जाती भिन्नता, धर्मभेद तसेच समाजातील भिन्न संस्कृतीचे लोक एकमेकांबरोबर आणि एकाच राजकीय छत्राखाली व एकाच न्यायव्यवस्थेखाली राहायला नाखुश असतात. बरेचदा राज्यकर्ते एखाद्या भागाकडे दुर्लक्ष करतात व त्या भागाची प्रगती खुंटते त्यामुळे एकाच देशात आर्थिक भेदभाव निर्माण होतात आणि त्यातून आतंकवादाचा जन्म होतो. आपण सर्वांनी जागरूक होणे आवश्यक आहे. एकंदर दहशतवाद समस्त मानवजातीचा शत्रू आहे, यामुळे संभाव्य धोक्यांची जाणीव ठेवून प्रतिकारासाठी सज्ज असले पाहिजे. जागतिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा हादरा भारताला बसलेला आहे, यामुळे भारतीय युवकांची भूमिका दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची असली पाहिजे. आमच्या देशात येऊन घातपाती कृत्य करणाऱ्या अतिरेकींना धडा शिकविण्यास सज्ज असले पाहिजे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply