संधिवात बाबत जगजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी १२ ऑक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा केला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सांधेदुखीची समस्या वाढत आहे. पूर्वी शेतकरी, माथाडी कामगार अशा अतिश्रमाची कामे करणाऱ्यांना सांधेदुखीचा त्रास होता. पण आता कमी कष्टाची कामे करणाऱ्या व्यक्ती, गृहिणी, ऑफिसमध्ये बसून कामे करणारे कर्मचारी, शाळा-कॉलेजांतील युवा पिढीलाही सांधेदुखीची समस्या जाणवू लागली आहे. कमी वयातच महिलांमध्येही संधिवाताचे प्रमाण वाढले आहे. संधिवाताचे १००हून अधिक प्रकार आहेत; पण यामध्ये हाडांचा संधिवात अधिक आढळतो.
एका अनुमानानुसार भारतात १४ कोटी लोकांना संधिवात आहे. संधिवात म्हणजे काय. तर हा एक प्रकारचा आजार आहे जो लहान पाच वर्षे वयाच्या वयापासून ते ६०-७०वयातील कोणत्याही माणसाला होऊ शकतो. जसे मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार आहेत तसा संधिवात हा एक प्रकारचा आजार आहे. ज्यामध्ये पेशंटला सांधेदुखीचा त्रास तर होतोच पण सांध्यांवर सुज येणे, सांधा गरम होणे, सांधा लालसर होणे, सतत सांधा दुखत राहणे अशी लक्षणे दिसू लागतात. शरिरातील दोन किंवा जास्त सांधे एकाच वेळी दुखत असतात. सांध्याच्या हालचालींमध्ये मर्यादा येतात. सांधे दुखण्याचे प्रमाण सकाळी, म्हणजे वातावरणात जेव्हा गारवा असतो, त्यावेळी जास्त प्रमाणात असते. वारंवार वेदनाशामक औषधे घेणे गरजेचे पडते. सांध्यांची झीज सांधेदुखीपेक्षा संधिवाताच्या आजारात जास्त प्रमाणात होते. सांध्यांची रचना बदलायला सुरुवात होते. गुडघ्याला बाक येणे, कंबरेची हालचाल मंदावते. भारतीय बैठकीचा संडास वापरताना व मांडी घालून बसताना त्रास होणे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply