नवीन लेखन...

जागतिक स्वमग्नता दिवस

२ एप्रिल हा दिवस जागतिक स्वमग्नता दिवस. या दिवशी संपूर्ण जगभर स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी उपक्रम केले जातात.

जरी स्वमग्नता हा आजार १९४३ सालापासून माहिती असला तरी १९८७ नंतर शास्त्रोक्त निदानाला सुरुवात झाल्यापासून दर वर्षी या विकाराने ग्रस्त मुलांची संख्या वाढत चालली. म्हणून UN च्या General Assembly ने २००७ पासून २ एप्रिल हा दिवस या विकाराच्या प्रसारासाठी राखून ठेवला आहे. स्वमग्नता काय आहे ते ब-याच जणांना माहीत नाही. स्वत:च्याच विश्वात, विचारात रमणे म्हणजे स्वमग्नता. ही स्वमग्न मुले नेहमी समाजापासून, अवतीभवतीच्या वातावरणापासून अलिप्त राहतात.

नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. स्वमग्न मुलांमध्ये प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे भाषा संप्रेषणाची, वैचारिक देवाण-घेवाणीची. सोप्या शब्दात समजावयाचं म्हणजे, जर आपल्याला एखाद्या अनोळखी प्रदेशात, अनोळखी लोकात एकटे नेऊन सोडले तर? आपण गोंधळून जाऊ, आपल्याला त्या लोकांची भाषा समजणार नाही वा आपली त्यांना! अशावेळी आपली जी स्थिती होईल नेमकी तशीच स्थिती या स्वमग्न मुलांची असते. म्हणूनच ही मुलं परिसराशी संपर्क नसल्यासारखी वागतात. बाह्य जगाशी यांचा काहीही संबंध नसतो.

आपले बोलणे त्यांना ऐकू जाते व बरेचदा ती त्याप्रमाणे वागतात देखील, पण त्यांचे डोळे आपल्याकडे बघत नाहीत. नजरेला नजर देत नाहीत. त्यांच्याकडून शाब्दिक प्रतिसाद फार क्वचित मिळतो. त्यामुळे कित्येकदा या मुलांवर मतिमंदत्वाचा शिक्का मारला जातो. पण यापैकी बरीचशी मुलं ही मतिमंद नसतात. या मुलांना तात्पुरत्या स्वरूपाचे संबंध वा व्यवहार जमत नाहीत. त्यामुळेच तर ती स्वत:मध्ये मश्गूल असतात. स्वमग्न मुलांना नुसतेच शाळेत घालून उपयोग नसतो तर वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा अवलंब करावा लागतो. या शाळांमध्ये प्रत्येक मुलाची क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे आयईपी तयार करण्यात येतो. त्यानंतर प्रायमरी गोल ठरवून त्यावर काम करण्यात येते. विशेष शिक्षण, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी तसेच ड्रामा थेरपीनुसार मुलांना शिकवले जाते. स्वमग्न मुलांसाठी ज्या वेगवेगळ्या थेरपीज्चा वापर केला जातो त्या म्हणजे स्ट्रक्चर्ड टिचिंग, चित्रबोली, इंद्रियानुभवाचे एकत्रीकरण पद्धती या सर्व पद्धतींनी विशेष मुलांना शिकवून त्यात त्यांना वैयक्तिक कौशल्ये, सूक्ष्मकारक कौशल्ये, संगीत उपचार पद्धती, एस.आय. पद्धती, चित्रकला पद्धती, भाषाविकास पद्धती, शैक्षणिक विकास पद्धती विविध आणि कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना व्यावसायिकरीत्या सक्षम करण्यासाठी होतो. आठवड्यातून दोन दिवस संगीत उपचार पद्धती, दोन दिवस ऑक्युपेशनल थेरपी, दोन दिवस स्पीच थेरपी, तसेच वर्तन समस्यांवर वन टू वन रेशिओमध्ये काम करून मुलांना प्रशिक्षित करणे अनिवार्य बनते.

दुर्दैवाने अनेक शहरात या मुलांना वरीलपैकी कोणत्याही प्रकारची थेरपी उपलब्ध नसते. त्यांना शिकण्यासाठी विशिष्ट प्रकारची खेळणी उपलब्ध नसतात, या विशेष बालकांना शिकवण्यास खास प्रशिक्षित शिक्षक नसतात. अशा असंख्य समस्यांना पालकांना तोंड द्यावे लागते. पुण्या-मुंबईसारख्या शहरात थोड्या प्रमाणावर काही संस्था आहेत, पण औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसारख्या शहरात हे प्रमाण अत्यल्प आहे. औरंगाबाद शहरातील रवींद्र नगरमध्ये स्वमग्न बालकांच्या उपचारासाठी आणि शिक्षणासाठी नुकतीच आरंभ ऑटिझम सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील पालकांची आणि स्वमग्न मुलांची तरी गैरसोय टळली आहे.

इतर शहरातही असे सेंटर्स स्थापन होऊन अशा मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी वर्कशॉप आयोजित करणे गरजेचे आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे

ऑटिस्टिक मुलांना व्होकेशनल शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणेही गरजेचे आहे. स्वमग्न बालकांची काळजी घेणारी अशा प्रकारची सेंटर्स उभी राहिली तर स्वमग्न मुलांना आपले हक्काचे आभाळ शोधता येईल….

ऑटिस्टिक मुलांची लक्षणे

1. स्वमग्न असणे

2. सतत एकच वर्तन करणे, म्हणजे उगीचच हात हलवणे, उड्या मारणे, गोल फिरणे वगैरे.

3. सतत रडणे वा हसणे किंवा क्षणात हसणे वा रडणे

4. एखादा शब्द किंवा वाक्य सतत बोलत राहाणे तसेच आपण म्हटलेला शब्द किंवा वाक्य परत परत उच्चारणे

5. स्पेशल स्किल्स नसणे

6. वास्तवातील गोष्टींची कल्पना करू न शकणे, पण कल्पनाशक्ती अफाट असणे

7. अति अॅास्पर्नजर सिंड्रोम मुले काही कलांमध्ये निपुण असतात.
उदा.गाणी,चित्रकला, कोडी, आकडेवारी, मोठी आकडेमोड तसेच वर्षानुवर्षाची कॅलेंडरची तारीख, वार, महिना किंवा रेल्वेचे वेळापत्रक पाठ करण्याची ताकद या मुलांकडे असू शकते. अल्बर्ट आइन्स्टाइनसुद्धा ऑटिस्टिक होता असे म्हणतात.

8. या मुलांना सेंसरी डिफेंसिफेन्सीव्हनेस असू शकतो. म्हणजे वास, चव, आवाज, स्पर्श आणि दृश्य यांच्यापैकी कशाच्या तरी बाबतीत आवडी निवडी टोकाच्या असतात, पण ऑटिस्टिक मुलांच्या बाबतीत ती निवड टोकाची असू शकते. त्याचा त्रास त्यांना असाहाय्य होतो व ही मुलं आऊट ऑफ कंट्रोल होतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/ रसिका फाटक ( विशेष शिक्षिका – ऑटिझम तज्ञ)/ अंबिका टाकळकर

पुणे.

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..