नवीन लेखन...

जागतिक कर्करोग दिवस

जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला २५ लाख कर्करोगपीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात दरवर्षी मोठी वाढ होत आहे. कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते – उदा. आतड्यांमध्ये सुरू होणार्याप कर्करोगास आतड्याचा कर्करोग किंवा त्वचेखालील बेसल पेशींमध्ये उगमस्थान असलेल्या कर्करोगास बेसल सेल कार्सिनोमा म्हणतात इ.

ज्या आजारांमध्ये असामान्य पेशींचे अनियंत्रित विभाजन होऊन त्या इतर ऊतींवर हल्ला करु शकतात अशा सर्व आजारांसाठी कर्करोग हा शब्द वापरला जातो. कर्करोगाच्या पेशी रक्त तसेच लसिका प्रणालींमार्फत शरीराच्या इतर भागांमध्ये पसरु शकतात. एक काळा असा होता की, कॅन्सर अर्थात कर्करोग म्हणजे आयुष्य संपल्याची खूण समजली जायची; मात्र या जीवघेण्या आजारावर आणि त्याच्या उपचारासंबंधी कित्येक दशकांच्या संशोधनानंतर कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. वाजवी खर्चाचे विविध उपायांसोबतच इच्छाशक्ती वापरून यावर मात केलेल्या रुग्णांच्या यशोगाथेमुळे हे चित्र आता पालटत आहे.

कर्करोगावर मात करण्याचे उपाय
कर्करोग पूर्णत : टाळता येणे जरी शक्य नसले तरी त्यावर मात करण्याचा दुसरा उपाय म्हणजे त्याचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे. वेळेत निदान झाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. कर्करोगाची सूचक लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा.
नियमितपणे शरीराची स्वतपासणी करा, स्त्रियांनी स्वत:चे स्तन तपासणी करणे गरजेचे.
नियमितपणे तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण शारीरिक तपासणी व काही प्रयोगशालीय तसेच रेडिओलॉजीकल चाचण्या करवून घेणे आवश्यक आहे. कर्करोगाच्या उपचारांकरिता खूप खर्च लागतो हा समज चुकीचा आहे. सध्याच्या उपचार पध्दतीत एक लाख रुपयांच्या आत 90 टक्के कर्करोगांवर पूर्ण उपचार करता येतो. फक्त योग्य अशा कर्करोग रुग्णालयात उपचारांना सुरुवात होणे गरजेचे असते. राजीव गांधी योजना आणि जीवनदायिनी योजना या शासकीय योजनांतूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळतो.
कर्करोगाच्या उपचार पद्धती
किमोथेरपी किमोथेरपी ही तात्पुरत्या स्वरूपात त्रायदायक ठरते. या थेरपीनंतर केस गळतात, अशक्तपणा जाणवतो, रक्त कमी होते, मळमळते यांसारख्या तात्पुरत्या त्रासांना सामोरे जावे लागते.
टार्गेटेड थेरपी
यापूर्वी कोबाल्टच्या मशीनव्दारे रेडिएशन दिले जात; मात्र जगभरात या तंत्रज्ञानावर बंदी आली आहे, त्याऐवजी आता बायोटेक्नॉलॉजीच्या आधारावरील तंत्रज्ञानाने टार्गेटेड रेडिएशन थेरपी केली जाते. लिनियर अँक्सेलेटर आणि एक्सरे जनरेटेड याव्दारे ही थेरपी होते. यात कॅन्सर ट्यूमरच्या (गाठीच्या) आकार आणि खोलीनुसारच रेडिएशन दिले जाते, त्याचा परिणाम केवळ ट्यूमरवरच होतो.
कर्करोगापासून दूर राहण्यासाठी
समतोल आहार : आहारात सर्व डाळी, कडधान्ये, विशेषत: मोड आलेली कडधान्ये, सालीच्या डाळी यांचा समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या व सर्व प्रकारची फळे (सालीसह) तर कोशिंबीर (गाजर, मुळा, काकडी, बीट इत्यादी.) मुबलक खावीत. शरीराला तंतुमय पदार्थ व रोगप्रतिबंधक घटक मिळतात. जंक फूड, कृत्रिम अन्नपदार्थ, अतिशय तिखट आहार, अतिरिक्त मांसाहार, स्निग्ध पदार्थांचे अतिसेवन टाळा.
व्यसनांना ठेवा दूर
धूम्रपान व इतर कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. अतिरिक्त प्रमाणात मद्यपानदेखील यकृत व पचनसंस्थेच्या कर्करोगाचा धोका वाढवते. तरुणांनी या व्यसनांची सुरुवातच न करणे केव्हाही हितकारकच ठरते.
नियमित व्यायाम करा
नियमित व्यायामाव्दारे वजन नियंत्रणात राखण्यास मदत होते. त्यायोगे स्तनांच्या, आतड्यांच्या कर्करोगाची जोखीम कमी होते. उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह या आजारांनाही नियंत्रणात ठेवता येते.
लसीकरण
हिपॅटायटीस बी या विषाणूविरुध्दची लस यकृताच्या कर्करोगापासून बचाव करते. या लसीचे तीन प्राथमिक डोस घेणे गरजेचे आहे. स्त्रियांमधील गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी एच.पी.व्ही. (ह्युमन पॉपीलोमा व्हायरस) या विषाणूविरुध्दची लस उपयुक्त आहे. 9 ते 26 वयोगटातील मुलींनी ही लस घेणे आवश्यक आहे. केवळ 2500 रुपयांत ही लस स्त्रीरोगतज्ज्ञांसह कर्करोग हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असते.

डॉ. नगरकर
संकलनसंजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..