बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे. भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, अजय वढावकर, मुक्ता बर्वे आणि इतरही अनेक नावे सांगता येतील.
महाराष्ट्रातील बालरंगभूमी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ रंगकर्मींना एकत्र घेऊन अनुभवी ज्येष्ठ रंगकर्मींचा सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनात “बालरंगभूमी अभियान” या संघटनेची दि. ५ जुलै २०१७ रोजी स्थापना झाली.
बालरंगभूमी विषयक विविध उपक्रमांची संख्या, व्याप्ती व दर्जा उंचावून बालरंगभूमी सकस व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.शालेय शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण देणे.बालनाट्य किशोरनाट्य कुणारनाट्य सादरीकरणासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, जिल्हा समिती स्तरावर प्रयत्न करणे. बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणे.शासनाच्या सह्याद्री आणि इतर खाजगी वाहिन्यांवर बालनाट्यासाठी वेळ राखून ठेवण्यासाठी तसेच रंगभुनीच्या इतर पुरस्कारांबरोबर बालनाट्याला पुरस्कार ठेवण्यासाठी व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे.बालदिनानिमित्त नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखेच्या ठिकाणी प्रतिवर्षी एक बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करणे. बालनाट्याचे प्रयोग, बालनाट्य महोत्सव आणि बालरंगभूमी संदर्भात विविध विषयांवर उपक्रम चर्चासत्रे इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे. दर्जेदार बालनाट्य संहिता संग्रहित करणे.बालनाट्य मार्गदर्शनपर पुस्तिका छापून शासनाच्या मदतीने त्या शालेय शिक्षकांपर्यंत पोहचविणे ही बालरंगभूमी अभियानाची उद्दिष्टे आहेत.
अशा रंगभूमी सेवा करणाऱ्या त्या सर्व बाल रंगकर्मीना बाल रंगभूमी दिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply