२०१९ रोजी पहिला जागतिक कापूस दिवस साजरा केला गेला. या वेळी महात्मा गांधी यांना जागतिक कापूस दिनाचे ‘आयकॉन’ म्हणून निवडले गेले होते आणि पहिल्या जागतिक कापूस दिनाचे औचित्य साधून भारत ‘डब्ल्यूटीओ’ला महात्मा गांधींच्या चरख्याची प्रतिकृती देली होती.
जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक भारत आहे, म्हणून जागतिक कापूस दिनाचे समर्थन देत जागतिक बाजारपेठ म्हणून कापसाचे महत्त्व ओळखण्याची संधी आणि त्याही महत्त्वाचे म्हणजे लाखो लघु व सीमांत शेतकऱ्यांच्या रोजी रोटीचे स्रोत आहे. दुसऱ्या जागतिक कापूस दिनी भारतीय कापसासाठी प्रथमच ब्रँड आणि लोगोचा शुभारंभ केला गेला. जागतिक कापूस बाजारात आता भारताचे प्रमुख सूत ‘कस्तुरी सूत’ म्हणून ओळखले जाईल.
कस्तुरी कापूस शुभ्रपणा, चमक, मुलायमपणा, शुद्धता, चमक वेगळेपणा आणि भारतीयतेसाठी ओळखला जाईल. कापूस हे प्रमुख व्यापारी पीक आहे, जे ६ दशलक्ष शेतकऱ्यांना उपजिविका प्राप्त करुन देते. भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमाकांवर आहे आणि जगातील सर्वात मोठा कापसाचा ग्राहक आहे. जागतिक कापसापैकी २३% कापसाचे उत्पादन भारतात होते. तर, जगाच्या सेंद्रीय कापसापैकी ५१% उत्पादन भारतात होते. यातून भारताचे शाश्वततेविषयीचे प्रयत्न दिसून येतात.
वस्त्रोदयोग मंत्रालयाने अपेडाच्या (APEDA) माध्यमातून सेंद्रीय कापसासाठी प्रमाणपत्र प्रक्रिया विहित केली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (CCI) शेतकऱ्यांना कापसासाठी आतापर्यंतची सर्वाधिक किमान आधारभूत किंमत दिली आहे. सीसीआयने 430 कापूस खरेदी केंद्र उघडली आहेत आणि शेतकऱ्यांना डिजीटल पद्धतीने 72 तासांत पैसे दिले जातात. तसेच ‘कॉट- अॅली’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, पीक परिस्थिती आणि उत्तम शेतीविषयीची माहिती दिली जाते. एमएसएमई सूतगिरण्या, खादी आणि ग्रामोद्योग, सहकारी सूतगिरण्या यासाठी प्रति कँडी काही सूट दिली जाते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply