1983 साली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला त्या बद्दल कपिल देव वर हा लेख…
आज भारतीय संघ टॉप ला आहे. हा झाला वर्तमान काळ परंतु नेहमी चर्चा होत असते ती १९८३ च्या वर्ल्ड कपची . परत आपल्या संघाकडे वर्ल्ड कप येण्याची चिन्हे दिसत आहेत . १९८३ च्या वर्ल्ड कपचा कप्तान होता कपिल देव. आज आपण कपिल देवाची स्वाक्षरी बघणार आहोत. कपिल देवच्या अनेक प्रकारच्या थोडा थोडा फरक असलेल्या स्वाक्षऱ्या बघण्यास मिळतात. परंतु त्याच्या स्वाक्षरीमध्ये पहिले अक्षर त्याचा भन्नाट स्पीड म्हण्याण्यापेक्षा नजाकत दाखवते. पर्णातू पुढला भाग मात्र टिपिकल कपिल देव स्टाईल आहे एकदम वेगवेगळा आहे तर त्याची हिंदीमधील स्वाक्षरी माझ्याकडे आहे तशी स्वाक्षरी इयत्ता ३ री मधील मुलाची कशी आहे तशी आहे . अर्थात कपिल देव क्रिकेटच्या मैदानावर आला आणि मग अनेक गोष्टी शिकला त्यातील एक गोष्ट तो मैदानावर येण्याआधी शिकला ती म्हणजे क्रिकेट , शिकला काय त्याचा तो नैसर्गिक खेळ खेळत असे. त्याचे हिंदी एकदम भन्नाट होते ते एका जाहिरातीत अनेकवेळा लोकांनी ऐकले असेल की तो कपिल देव सर्वकाही मैदानावर आल्यावर शिकला हे महत्वाचे त्याला मिळणाऱ्या यशाने त्याला ते शिकण्यास भाग पाडले हे पण महत्वाचे आहे.
आता आपण कपिल देवाची स्वाक्षरी बघू त्याची नेहमीची स्वाक्षरी वेगळी आहे ‘ के ‘ या अक्षरापासून शेवटपर्यंत त्याची स्वाक्षरी पाहिली तर ती भन्नाट सुरवात करून शेवट मात्र खालच्या स्तरावर होतो. कधी तो देव ‘ हे इंग्रजी अक्षर सरळ काढतो तर कधी तो स्वाक्षरीचा फोर्स खालच्या स्तरावर घेऊन शेवट करतो. नेहमी तो अशीच स्वाक्षरी करताना दिसतो. त्याचा मूड वेगळा असेल तर वेगळी करतो खरे तर त्याचा प्रवास बघीतला तर भन्नाट होता परंतु शेवटचा मात्र पार ढकल गाडी होती कारण त्याला सर रिचर्ड हॅडलीचा ४३१ चा विक्रम मोडायचा होता. कपिल देवाने तो मोडला त्याने कसोटी कारकिर्दीत ४८४ विकेट्स घेतल्या आणि कसोटी क्रिकेटला पूर्णविराम दिला हा त्याचा प्रवास म्हणजे शेवटचा प्रवास खडतर होता. तो प्रवास त्याच्या स्वाक्षरीचा शेवट दाखवतो आणि त्याचबरोबर त्याच्यावर मॅच फ़िक्सिग चे बालंट आले तेव्हा तो अत्यंत संघर्षातून गेला होता. कपिल देव म्हणजे जिद्द असेच म्हणावे लागेल आणि क्रिकेटमध्ये त्याने १६ वर्षे गोलंदाजी केली हे खायचे काम नाही , ती सुद्धा भन्नाट गोलंदाजी त्याची वर्ल्ड कप मधील झिब्बावे विरुद्धची नाबाद १७५ ची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. त्यामुळेच तर आपल्या संघाला १९८३ चा वर्ल्ड कप दृष्टीक्षेपात आला होता.
कपिल देव याचा स्वभाव तुमच्या आमच्यासारखा आहे जे काय आहे ते बोलून मोकळा होता आपल्या भावभावनांना वाट मोकळी करून देतो. याचा अनुभव अनेकांना आला आहे. त्याच्या स्वभावात व्हेरिएशन आहे. सुरवातीला म्हटल्याप्रमाणे त्याची हिंदी स्वाक्षरी जास्त काही सांगून जात नाही परंतु एक गोष्ट सांगते ते म्हणजे मी आहे तसा आहे. इंग्रजी जी पूर्ण स्वाक्षरी आहे त्यातील ‘ डी ‘ हे अक्षर एकदम मोठे नाही तसे लहानही नाही . स्वाक्षरीखाली छोटा अंडर स्ट्रोक आहे तर दुसऱ्या स्वाक्षरीखाली अंडर स्ट्रोक वरतून खाली येणारा आणि अत्यंत विचित्र आहे. ही स्वाक्षरी त्याचा स्वभाव हा आतल्या आत कधीकधी विचार करणारा आहे हे दाखवते आणि ते त्याचे वागणे त्याच्या चेहऱ्यावर दिसते. मॅच फ़िक्सिग च्या आरोपांनंतरची त्याची मुलखात पहा तो अक्षरशः रडताना दिसतो , सतत आतल्या आत गुसमटताना दिसतो. त्याला आक्रमक होता येते परंतु तो विनाकारण आक्रमक होत नाही. जसे अनेक खेळाडू हल्ली होतात .
त्याची स्वाक्षरी माझ्या दृष्टीने अत्यंत अनाकलनीय आहे. अर्थात हा माझा दृष्टिकोन असेल. त्याच्या स्वाक्षरीचा रिदम , फ्लो निश्चित चुकलेला आहे किंवा विचित्र आहे. परंतु त्याच्या स्ट्रोक्सवरून जाणवते तो जे काही बोलतो ते बिन्धास बोलतो, समोरासमोर तो हाणतो हे अनेकांना जाणवले असेल परंतु काही वेळानंतर तो नरमाई देखील घेतो कारण त्याला कळून चुकलेले असते बोलून तर गेलो आहोत . तो नेहमी उठसुठ उदाहरणे द्वेत नाही . कॉमेंट्री करताना तो जे शब्द वापरतो ते मजेशीर असतात. अनेकांना ते आवडतात , तशी त्याची बोलण्याची पद्धत आपल्या सारखीच आहे त्यामुळे तो सहजपणे मिसळून जातो.
कपिल देव च्या स्वाक्षरीबद्दल प्रामुख्याने सांगताना एकच वाटते हा माणूस दिसतो तसा नाही त्याच्या मनात अत्यंत वेगवेगळी आदोलने होत असतात परंतु बोलताना तो सावधता बाळगण्याचा प्रयत्न करो परंतु स्वभावामुळे तो बोलून जातो इतर खेलाडूसारखा डिप्लोमॅटिक तो नाही. मॅच फ़िक्सिग नंतरचा त्याचा विडिओ पहा त्याचा सर्व स्वभाव त्यात दिसून येतो , हा माणूस मॅच फ़िक्सिग करूच शकत नाही हे मी त्याच्या स्वाक्षरीवरून सांगतो . कपिल देव हा खरे तर आपल्या संघाला लाभलेला असा खेळाडू आहे की ज्याने १९८३ मध्ये जी जिगर दाखवली आणि त्याच्या साथीदारांनी जी काय साथ दिली त्यांनी भारतीय संघाला एक आदर्श घालून दिला ‘ आम्हीही काही कमी नाही .’
कपिल देव याची स्वाक्षरी वाटते अनाकलनीय पण त्याचे वागणे, वावरणे बघताना तो एकदम वेगळा वाटतो ,आपल्याला वाटतो याचा अनुभव मी अनेकवेळा घेतलेला आहे. हा माणूस स्वाक्षरीप्रमाणे नाही कारण त्याच्या पहिले अक्षर जे ‘ के आहे त्या ‘ के ‘ ला जो उभा स्ट्रोक असतो , रेघ असते ती पुढे असून ‘ पी ‘ या अक्षरात सामावून गेलेली आहे म्हणून मी त्याला अनाकलनीय असे म्हणतो.
नुकताच तो जिवघेण्या आजारातून बाहेर पडला आहे, त्याला जगातील सर्व मैदानभर शुभेच्छा.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply