नवीन लेखन...

जागतिक हत्ती दिवस

शतकानुशतके हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे. माणसाने हत्तीसारख्या अवाढव्य प्राण्याचा उपयोग अवजड वजने उचलणे,वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन म्हणून वर्षानुवर्षे केला आहे. मिथ्यक, जातककथा, पंचतंत्रादी माध्यमांतून हत्ती हा पुरातन काळापासून नागरजीवनाचा अविभाज्य हिस्सा असल्याचे लक्षात येते. भासाने लिहिलेल्या स्वप्नवासवदत्तमध्ये राजा उदयनाकडे हत्तीला वीणावादन करून आकृष्ट करण्याची विद्या अवगत होती असा उल्लेख आहे.

‘मातंगलीला’, ‘हस्तायुर्वेद’ अशा ग्रंथांमधून हत्तीच्या प्रशिक्षणाविषयी, त्याच्या आरोग्याविषयी व व्यवस्थापनाविषयी सखोल विचार केलेला आढळतो. सैन्यात हत्तीचा वापर सर्वप्रथम भारतात केला गेला असे सांगितले जाते. पूर्वीच्या राजेरजवाड्यांचे वैभव त्यांच्याकडे असलेल्या गजदळावरून तोलले जायचे. चक्रवर्ती राजाकडे बलाढ्य गजदळ असायचे. हत्तीला धर्मातही विशेष स्थान आहे. गजलक्ष्मी, ऐरावत, गणेश अशा अनेक दैवी रूपांमध्ये हत्तीची आराधना केलेली दिसून येते. लोकसाहित्यातही हत्ती वेगवेगळ्या रूपांत डोकावत राहतो. भारतीय संस्कृतीत हत्ती हे समृद्धी, सृजनशीलता, बुद्धी, औदार्य, शौर्य, मांगल्य व राजयोगाचे प्रतीक मानले गेले आहे.

हत्ती हा मुळात कळप-प्रिय प्राणी… चटकन माणसाळणारा… अशा ह्या विशालकाय, सस्तन, कळप-प्रिय प्राण्याची आपल्या भाई-बांधवांशी संपर्क साधायची क्षमताही अतिशय प्रभावी व संवेदनशील आहे. केवळ ध्वनीच्या माध्यमातूनही हत्ती आपल्या कळपाशी व इतर प्राण्यांशी व्यापक संपर्क साधू शकतो. ह्या लेखात आपण त्याच्या ह्या संवादकुशलतेचीच अधिक माहिती घेणार आहोत. हत्ती आपल्या दृष्टी, गंध, स्पर्श व ध्वनी ज्ञानाचा उपयोग इतर हत्तींशी व प्राण्यांशी संपर्क साधण्यासाठी करतो. त्याला स्पंदन-लहरी देखील चटकन जाणवतात आणि त्यांचा उपयोग तो आपल्या संवाद व हालचालींसाठी करत राहतो.

हत्तींनी दिलेले ध्वनी-संकेत हे वाऱ्यामुळे सर्व दिशांना जातात. त्यातून तो संदेश ज्यांसाठी आहे अशा प्राण्यांपर्यंत व ज्यांसाठी नाही अशांपर्यंतही जात असतो. ध्वनी-संकेत हे तात्कालिक स्थितीचे वर्णन करण्यासाठी जास्त करून वापरले जातात. त्यातही वातावरणामुळे अनेक अडथळे येऊ शकतात. पण त्यावर मात करत हत्ती आपल्या शरीररचनेचा व वेगवेगळे आवाज काढण्याच्या क्षमतेचा समर्थ वापर करून एकमेकांशी संपर्क साधताना दिसतात. त्यांची खासियत म्हणजे खर्ज स्वरांतील व दीर्घ पल्ल्यावर साधलेला संवाद.

हत्ती हा एक विशालकाय देहाचा प्राणी आहे. भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, कर्नाटक, आसाम, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत हत्ती मोठया प्रमाणावर आढळतात.

हत्तीची उंची सव्वातीन ते साडेतीन मीटरपर्यंत असते. काळा रंग, लांब सोंड, भले मोठे खांबासारखे पाय, सुपासारखे कान व अगदी बारीक डोळे यावरून हत्ती ओळखला जातो.

भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठमोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालादेखील सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखना’ म्हणतात. आफ्रिकेत सापडणाऱ्या हत्तीच्या नराला व मादीला दोघांनाही मोठमोठे सुळे असतात. भारतीय हत्तीची पाठ फुगीर असते तर आफ्रिकन हत्तीची पाठ खोलगट असते. हत्तीचे शरीर अवाढव्य असते. त्याचे वजन पाच ते सहा टन असते. हत्ती पाण्यात चांगले पोहतात.

इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात.

हस्त नक्षत्र लागले की हत्तीची प्रतिमा पाटावर रेखून त्याच्याभोवती फेर धरत ”ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडिला करीन तुझी सेवा…..” अशी हादग्याची किंवा भोंडल्याची गाणी म्हणणे हे महाराष्ट्रातील स्त्री संस्कृतीचे अविभाज्य अंग! गणेशोत्सवात गजाननाची मनोभावे पूजा-अर्चा करून प्रत्येक मराठमोळ्या घरात विघ्नहर्त्या गणपतीला सादर वंदन केले जाते.

हत्ती हा बालगोपालांचा विशेष आवडता प्राणी. कधी ओवीत, कधी अभंगांत, कधी दोह्यांमध्ये, कधी पोथ्या पुराणांमध्ये तर कधी सुभाषितांमध्ये हत्तीविषयीची, त्याच्या स्वभावधर्माविषयीची माहिती पुढे येत राहते. तसेच त्याचे भारतीय संस्कृतीशी असलेले अतूट नाते वैदिक ग्रंथांपासून ते अगदी आताच्या नवकाव्यांपर्यंत साहित्य, कला, शास्त्रांतून आणि विविध माध्यमांतून अधोरेखित होत जाते. हत्तीच्या गुणवैशिष्ट्यांचा वापर करून रचलेली ही काही सुभाषिते त्याचेच प्रतीक म्हणता येतील.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on जागतिक हत्ती दिवस

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..