संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये २० मार्च हा जागतिक आनंद दिवस म्हणून घोषित केला.तेव्हा पासून जगभरातील लोकांच्या जीवनात आनंदाचे महत्त्व ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांने जागतिक आनंद दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
आंतरराष्ट्रीय आनंद दिन मोहिमेची एक संकल्पना ठेवण्यात आली आहे, “जागतिक मानव कुटुंबातील सर्व ७.८ अब्ज सदस्यांना, आणि सर्व २०६ राष्ट्राना COVID-19 कोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्यासाठी एकता आणि दृढसंकल्प करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आहे.
दर वर्षी संयुक्त राष्ट्राकडून जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जारी करण्यात येते. नुकतीच या वर्षासाठी संयुक्त राष्ट्राकडून जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जारी करण्यात आली.
संयुक्त राष्ट्राची या संदर्भातील यादी ६ गोष्टींवर आधारित असते. यात उत्पन्न, आरोग्यदायी जीवन, सामाजिक स्थिती, स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात आनंदी असण्याच्या प्रमाणात घट झालेली आहे. भारतात तर हा स्तर सतत खालावत असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाचं संकट असतानाही सलग चौथ्या वर्षी फिनलँड जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. फिनलँड पुन्हा जगातील सर्वात सुखी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत १४९ देशांचा समावेश करण्यात आला आहे. या १४९ आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक १३९ वा आहे .
फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला असून फिनलँडच्या खालोखाल डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे. स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवलाय. जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही या यादीत पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळालेलं नाही. जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिकेचा १९ वा क्रमांक आहे.
चीन या यादीत ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५ , नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या स्थानी आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.
Leave a Reply