नवीन लेखन...

जागतिक हृदय दिन

आजच्या दिवशी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. आज काल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदयरोगाविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी याची माहिती जनतेपुढे मांडणे महत्वाचे ठरते.

इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाखू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे ह्यागोष्टी ताबडतोब बंद करायला हवे.

हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखादया छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे.

हृदयरोग होण्यासाठी निश्चित वय नाही, तो कोणत्याही वयात येऊ शकतो. यासाठी वयाची तीस वर्षे पूर्ण होताच हृद्याची तपासणी करून घ्यायला हवी. त्यात रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाचीही तपासणी होती. अशी तपासणी दरवर्षी करायला हवी.

हृदयरोग टाळण्यासाठी नियम आहार-विहाराचे:

आहार पचनाकडे लक्ष देणे, प्रकृतीनुरूप व पचण्यास हलके अन्न खाणे, आहारात आले, सुंठ, मिरी, हिंग, जिरे वगैरे दीपक, पाचक द्रव्यांचा, तसेच सात-आठ चमचे साजूक तूप, शुद्ध ताजे दूध यांचा समावेश असू देणे.

आठवड्यातून एक दिवस रात्रीचे लंघन करणे, यामुळे पोटाला विश्रांती मिळते व पचन व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.

नियमित चालायला जाणे, प्रकृतीनुरूप आसने करणे.

अनुलोम-विलोम, ॐकार गुंजन व ध्यानसंगीत यांच्या मदतीने शरीरात प्राणसंचार व्यवस्थित व्हावा व हृदयाला प्राणशक्तीलचा पुरेसा पुरवठा व्हावा याकडे लक्ष देणे.

तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने हृदयाची ताकद वाढवणारी, सुहृदप्राश, कार्डिसॅन प्लस वगैरे हृदयाची कार्यक्षमता वाढवणारी रसायने नियमित सेवन करणे.

नियमित अभ्यंग करणे, विशेषतः छाती-पोट व पाठीवर रोजच हलक्यात हाताने तेल जिरवणे.

हृदयरोगाचे स्वरूप, कारण, तीव्रता वगैरे अनेक गोष्टींचा विचार करून प्रकृतीनुरूप नेमके उपचार योजावे लागतात. हृदयरोगात औषधोपचारांबरोबरच पथ्य-अपथ्य सांभाळणेही खूप महत्त्वाचे असते. तेल, आंबट पदार्थ, आंबट दही-ताक वगैरे पदार्थ, पचायला अवघड अन्न, तुरट पदार्थ हृद्रोगात वर्ज्य समजावेत, परिश्रम करू नयेत, उन्हात जाऊ नये, राग, मैथुन, चिंता, अति बोलणे टाळावे.

तांदूळ, साळीच्या लाह्या, जव, मूग, परवर, कारले वगैरे गोष्टी हृदयरोगात पथ्यकर होतात.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..