आपल्याकडील पदार्थ खूपच व्यंजन मिश्र. त्यांचा इतिहास कुठे सापडेल? इतर प्रांतांतले पदार्थ पाहिले तरी हेच प्रश्न पडतील. पश्चिमेकडे यीस्ट वापरून पाव बनवला गेला तर इकडे इडली- डोशाचे पीठ रात्रभर आंबवले गेले. ते प्रथम कधी आंबवले गेले, इडली-डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया पहिल्यांदा कशी घडली असेल? असे असंख्य प्रश्न राहतात. इडली हा पदार्थ मूळचा दक्षिण भारतीय म्हणून ओळखला जात असला तरी, इडली हा प्रकार इंडोनेशियातून भारतात आला आहे. तेथे त्याला किडली/ केडली असे म्हटले जाते. भारतात पदार्थांवरूनही श्रेयवाद आहेत. इडलीचे वर्णन कर्नाटकात ९२० जुलिअन कालगणनेत आढळते. तर तमिळ प्रांतात म्हणे इडली १७ व्या शतकात आली. गुजराथ प्रांत यातही मागे नाही. त्यांच्या मते ढोकळा हा पदार्थ दक्षिणेला १०- १२ व्या शतकात तेथे गेला. कारण त्याकाळी सौराष्ट्र प्रांतातील रेशीम व्यापारी महाराष्ट्रमार्गे तेथे जात असत आणि तेव्हाच ढोकळ्याचे इडली या प्रकारात परिवर्तन झाले. अशी इडलीची ही गाथा.
इडलीवरची कविता
एक होती इडली
ती खूप चिडली
तरातरा धावली
सांबारात जाऊन पडली
सांबार होते गरम
इडली झाली नरम
चमचा आला खुशीत
बसला बशीच्या कुशीत
चमच्याने पाहिले इकडेतिकडे
इडलीचे केले तुकडेतुकडे
मुलांनी केली इडली फस्त
इडली झाली होती मस्त!
कवी माहित नाही.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply