जागतिक आरोग्य संघटने तर्फे दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिन म्हणजेच जागतिक मूत्रपिंड दिवस साजरा केला जातो. जागतिक किडनी दिनाचा उद्देश जगातील किडनीच्या आजाराचा वाढता प्रसार रोखणे आणि त्याचा प्रसार कमी करणे हे आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (आयएसएन) आणि इंटरनेशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशनतर्फे १९२६ साली जागतिक किडनी दिवस ६६ देशांमध्ये सुरू करण्यात आला. या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये जागतिक किडनी दिनाची थीम ‘किडनीच्या आजारानतही चांगले रहाणे’ ही आहे.
किडनीचं महत्त्वाचं काम आहे, शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकणं. जेव्हा किडनीच्या या कामामध्ये अडथळे निर्माण होतात त्यावेळी किडमध्ये टॉक्सिन्स मोठ्या प्रमाणावर जमा होतात. त्यामुळे हातापायांवर आणि चेहऱ्यावर सूज येते. – लघवीचा रंग गडद होतो. जर तुम्ही पाणी कमी पित असाल किंवा तुम्हाला लघवी करताना त्रास होत असेल तर ही किडनीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याची लक्षणं आहेत. याव्यतिरिक्त लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लघवीमध्ये रक्त येण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. – शरीरामध्ये कमजोरी, थकवा किंवा हार्मोन्समध्ये होणारी कमतरता म्हणजे किडनी खराब होण्याचं लक्षण आहे. – ऑक्सिजनचा स्तर कमी होणं ज्यामुळे चिडचिड आणि एकाग्रता कमी होत असेल तर किडनीच्या आजारांचं लक्षण आहे. – उन्हाळ्यामध्ये थंडी वाजत आणि ताप येत असेल तर किडनी खराब होण्याचे संकेत आहेत. – किडनी खराब झाल्याने शरीरामध्ये विषारी पदार्थ जमा होतात. ज्यामुळे त्वचेवर रॅशेज आणि खाज येण्यासारख्या समस्या होतात. परंतु असं गरजेचं नाही ही सर्व लक्षणं फक्त किडनीच्या आजारांमध्येच दिसून येतात. – किडनीच्या आजारामुळे रक्तामध्ये युरियाचा स्तर वाढतो. हा युरिया अमोनियाच्या रूपामध्ये उत्पन्न होतो. ज्यामुळे तोंडातून दुर्गंध येणं आणि जीभेची चव बिघडणं यांसारख्या समस्या होतात.
निरोगी किडनीसाठी आहार खूप महत्वाचा आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply