नवीन लेखन...

जागतिक सरडा दिवस

अरे किती रंग बदलशील? एखादा सरडा पण तुझ्यापेक्षा कमी रंग बदलत असेल , असं बोलून आपण सरड्याला बदनाम करतो. वास्तविक पाहता सरडा आपला रंग वेगवेगळ्या कारणांसाठी बदलतो. त्याला अनेक नैसर्गिक व विज्ञानातील कारणं आहेत.

आज दिनांक १४ ऑगस्ट. आज जगभरात सरडा दिवस साजरा केला जातो. पहायला गेलो तर ह्या दिनाला असा काही इतिहास नाही. फक्त काही पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात.

सरडा हा सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक प्राणी आहे. बरेचदा आपण गवतातून किंवा दाट झाडी झुडुपांमधून वाट काढून चालत असताना पटकन काहीतरी सरपटल्यासारखं होतं आणि आपल्या अंगावर सर्रकन काटा येतो. आपण क्षणभर श्वास रोखून धरतो आणि आसपास बघतो तर जवळपासच्या झाडांच्या रंगाशी एकरूप होऊन थांबलेला सरडा आपल्याला निरखून पाहिल्यावर दिसतो.

सरडा नक्की कशासाठी रंग बदलतो हे जाणून घेण्यासाठी बऱ्याच जणांनी त्यावर संशोधन केलं होतं. त्यात त्यांना ह्या बाबी लक्षात आल्या.

१) सरडा स्वतःच्या रक्षणासाठी रंग बदलतो.

२) सरडा शिकार सहजतेने करता येण्यासाठी आपला रंग बदलतो. जर त्याने रंग बदलला नाही तर सावज सावध होऊन पळून जातं.

३) सरडा त्याच्या भावना दर्शवण्यासाठी रंग बदलतो.

संशोधनांती जगभरात तब्बल ५६,००० सरड्यांच्या प्रजाती असल्याचे ध्यानात आलं आहे. सरड्याचं वैज्ञानिक नाव Lacertilia असं हे.

– आदित्य दि. संभूस.

#World Lizards Day # 14th August

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..