जागतिक मोटरसायकल डे निमित्ताने जगातील सर्वात जुन्या मोटरसायकलची माहिती.
जगातील पहिली मोटरसायकल १२७ वर्षापूर्वी बनली गेली. या मोटरसायकलचे नाव होते Hildebrand & Wolfmueller
ही मोटरसायकल हेनरिक व विल्हेम यांनी बनवली होती. हेनरिक व विल्हेम हे दोघे स्टीम इंजीनियर होते. त्यांनी २० जानेवारी १८९४ रोजी या मोटरसायकलचे पेटेंट केले होते.
या मोटरसायकलचे वजन ५० किलो असून याचा टॉप स्पीड ४५ किलोमीटर प्रति तास होता. ही मोटरसायकल म्युनिक जर्मनी मध्ये बनवली गेली होती. या मोटरसायकलला टू-सिलेंडर, फोर स्ट्रोक इंजीन आहे. ही मोटरसायकल २.५ बीएचपी की पॉवर जनरेट करु शकते. त्या काळी या मोटरसायकलने खूप प्रसिद्धी मिळवली होती.
पहिल्या विश्व युद्धा मुळे १९१९ मध्ये हेनरिक व विल्हेम यांना आपला कारखाना बंद करावा लागला,त्या मुळे याचे प्रॉक्डक्शन बंद झाले.
सायकल सारखी दिसणारी ही मोटरसायकल आता जर्मनी व इग्लड मधील सायन्स म्यूझीयम मध्ये बघू शकता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply