नवीन लेखन...

वर्तुळाबाहेरील जग ?

मानवी मन कसे असते याचा शोध चालू आहे परंतु अवतीभवती अनेक माणसे दिसतात ती अशी वागतात हेच कळत नाही. मी काही दिवस एक माणूस पहात असे सकाळी फिरावयाला येत असे तो वळणावर वळला की नमस्कार करत असे. काही दिवस दिसला आता दिसत नाही. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तो त्याच्याबद्दल माहिती मिळते का हे बघण्याचा प्रयत्न केला पण काही दिवसात तो दिसलाच नाही माझा हा शोध अर्धवट राहिला.

मानवी मन आणि विचार याचा शोध घेताना अनेक गोष्टी समजतात गीता हा ग्रंथ अर्जुनाला जितका समजला तितका तितका सगळ्याना समजेल का समजला का ? पुढे पुढे प्रत्येकाने गीतेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला , जर एखाद्या मोठ्या व्यक्तीने गीतेवर आपले मत मांडले तर ते ग्राह्य समजले जाते परंतु प्रत्येकाला काहीतरी नवीन काळानुरूप सापडत जाते असे ओशो म्हणतात.

ओशो म्हणतात शांत चित्ताने कर्म केल्यास ते अनासक्त होते. अनासक्तपणे कर्म केले तर चित्त कधीच शांत होत नाही. प्रश्न केलेल्या कर्माचा नाही तर प्रश्न तुमचा आहे कारण तुम्ही तिथे महत्वाचे असतात .

आता या विषयावर २०१९ साली विचार केला तर आढळून येईल की कुठलेही कर्म आसक्तीने केले जात असताना मनाला शांती कशी मिळेल, तो सर्व दरवाजे ठोठावणाराच, हल्ली तेच होत आहे. प्रत्येक ठिकाणी आपणच महत्वाचे असतो इतके लक्षात ठेवले पाहिजे. कालानुरूप सगळेच बदलत आहे अगदी मूल्यांपासून आणि तत्त्वांपासून आज अर्थात ह्या दोन मूल्यांचा वापर फक्त बोलण्यासाठी होत आहे आचरणाची मात्र निश्चित नाही त्यामध्ये राजकारण्यापासून सामान्य माणसापर्यंत कसा केला जात आहे हे आपण बघत आहोतच.

आसक्ती आणि अनासक्ती ह्या दोन गोष्टी प्रत्येकाच्या मनात असतात अगदी साधूच्या देखील कारण अनासक्तीची देखील आसक्ती असू शकते असे मला वाटते. समाजाकडे बघताना , सामान्य माणसाकडे बघताना ती मानानी मोठी असो किंवा लहान असो आपल्याला सहसा अनासक्त माणूस सापडत नाही.

आता वेगळे उदाहरण घेऊ त्यातून वृत्ती दिसते .आपण अनेक दिवसात एका मित्राकडे गेलो नसलो आणि एकदम गेलो तर त्याच्या मनात येणार अरे हा का आला असेल , काय काम असेल. सहजपणे कुणाला भेटायला जाणे हे आता दुर्मिळ होणं आहे कारण माणूस माणसापासून दूर जात आहे तो त्याच्या व्यापामुळे आणि स्पर्धेमुळे कारण त्याला टिकून रहावयाचे असते. प्रगती आणि यश याच्या व्याख्येचे उत्तर आता फक्त ‘ पैसा ‘ हे दिले जाते तोच मापदंड सगळेकडे वापरला जात आहे, परंतु मला हे काम करून पैसे कमी मिळतात पण कामाचे समाधान मिळते असे म्हणणारे सापडतील परंतु निश्चित कमी प्रमाणात. कारण कुठे तरी प्रत्येक कामाच्या मुळाशी आसक्ती आहे हेच जाणवते. आज पगाराचे पॅकेज किती मिळते यावर अवलंबून असते आणि आपण स्वतः परिस्थितीच्या हातचे पॅकेज कधी होतो हे जाणवत नाही. ह्याच्या मुळाशी आसक्ती आहे प्रचंड आसक्ती आणि त्या आसक्तीबरोबर स्वतःवरचे प्रेम म्हणजे मी, मी आणि मी . ह्या मी आणि माझे यांनी प्रचंड स्पर्धा निर्माण केली प्रत्येक क्षेत्रात परंतु या मी पणाचा शेवट कसा होतो ते समाज बघत असतो पण त्यापासून किती शिकतो त्याचे त्यालाच माहीत .

मी वरती ओशोंची वाक्ये घेतली खरी परंतु त्यांनी जे विवेचन केले ते मुद्दाम घेतले नाही कारण त्यांचे म्हणणे मला या कालखंडात पडताळून बघावयाचे होते. कारण माझी भूमिका कधीच फॉलोअरची नसणार आहे तर थिंकरची असणार आहे , ह्या काळात राहून ह्या काळात ते मत कसे वाटते ते बघण्याचा प्रयत्न करणार आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. एखादा मोठा माणूस सांगून जातो ते सगळेच पटले पाहिजे असेही नसते. मी फक्त त्या मोठ्या व्यक्तींच्या विचारांचा आधार घेऊन , ह्या कालखंडात ते विचार कालबाह्य आहेत का त्रिकालाबाधित आहेत हे बघण्याचा प्रयत्न करत आहे. काही सत्य नेहमी त्रिकालाबाधित असतात ती सत्ये म्हणजे आपले षड्रिपू. माणसाचे विचार बदलू शकतात परंतु वृत्ती खरेच बदलतात का ?

लहानपणी हिंदीमध्ये एक धडा होता, ‘नाखुन क्यू बढते है?’ खरे तर नखे हे मानवी प्रवृत्तीमधील हिंस्त्रता दखवतात , ती जोपर्यंत वाढत आहेत तो पर्यंत त्या प्रवृत्ती तशाच रहातील. माणसापासून प्राण्यापर्यंत नखांचे स्वरूप वेगवेगळे आहे हे लक्षात घेतले पाहिजे .

आता षड्रिपू कसे त्रिकालाबाधित आहेत आणि का ह्याचा शोध पुढे घेणारच आहोत…

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..