नवीन लेखन...

वर्तुळाबाहेरील विश्व…

एखादी हवी ती गोष्ट मिळाल्यावर माणूस किती काळ तृप्त रहातो? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे मिळतील. आजच्या कॉर्पोरेट क्षेत्रात तर अतृप्ती हाच खरा यशाचा पाया आहे, प्रगतीचा पाया आहे असे म्हटले जाते त्या विचाराला मी कधीच छेद देणार नाही कारण अतृप्ती आणि क्षमता यांचे नाते खरे तर घट्ट असते परंतु जसजशी वयोमानामुळे म्हणा किंवा लाभलेली क्षमता कमी होते किंवा इच्छा आणि क्षमता यांचेही नाते असेच असते. कुठेतरी बॅलन्स बिघडला तर आपल्या शरीरात किंवा मनात फरक पडतो आणि हा फरक आपले शरीर झेपू शकते की नाही असा संभ्रम जेव्हा निर्माण होतो तेव्हा समजावे पहिली घंटा वाजलेली आहे मग वय ३० वर्षाचे असो किंवा ६० वर्षाचे किंवा अधिक.

हे ज्याला समजते तो आयुष्यात बरेच काही करू शकतो. आपण आपल्या आकांक्षामुळे आपलीच फरफट करत आहोत का हे बघीतले पाहिजे. एक माणूस खूप योगसाधना करतो लोकांना आदर्शवत वाटतो परंतु त्यातून जी ऊर्जा मिळते त्याचा वापर आपल्या धंद्यासाठी किंवा राजकारणासाठी वापरतो मग त्याच्या हातून कुठलेही बॅलन्स बिघडवणारे कृत्य घडले तर त्याची योगसाधना खरेच त्याला तसे करण्यासाठी फिट ठेवेल का? खरे तर योग किंवा तत्सम क्रिया तुमची क्षमता वाढवतात परंतु त्या क्षमतेचा वापर आपण आपल्या स्वार्थ यशासाठी करत असाल तर त्याचे दुष्परिणाम आज नाही परंतु त्याला कालांतराने जाणवणार मग तो सतत खोटे बोलणारा किंवा स्वतःचा स्वार्थ हेतू साध्य करण्यातही जर ती क्षमता वापरत असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील. खरे तर तो जेव्हा असा विचार करतो तेव्हाच तो त्याच्या साधनेपासून दूर जात असतो परंतु त्याचे त्याला कळत नसते, समाजाला किंवा जाणकारांना निश्चित तो बदल जाणवतो. तो लोकांना फसवत असतो? हे विचारी लोकांच्या लक्षात येते पण समाजात दोन्ही प्रवृत्तीची माणसे असतात.

आपण काय करतो, कोणता कसा विचार करतो आणि का करतो यांच्याकडे कोणी लक्ष देते का जर लक्ष नाही दिले तर एक दिवस असा निर्माण होतो की आपण आपले रहात नाही, मनःशांती ढळते आणि तेथूनच आपल्या वैचारिक दृष्टिकोनापासून दूर जाऊ लागतो, इतके दूर जातो आणि मग त्या गोंधळात तो इतका बुडतो मग कधी योगा करतो तर कधी मेडिटेशन तर कधी हातात अंगठ्या, डोक्याला टिळा ह्या सर्व गोष्टी येतात. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे तसा विद्वान आहे, उत्तम बुद्धिमत्ता आहे, भाषणेही देतो, परंतु पारंपरिक पोशाख मी त्याला नेहमी म्हणतो अरे कर भाषण जीनची पॅंट घालून कर काही फरक पडणार नाही तुझ्या विचारात काय फरक पडणार आहे का, ते उपरणे तर कधी एकाच रंगाचा झब्बा असला तर तू तुझा तूच रहाणार आहेस ना, पण त्याला ते पटत नाही, तो तसेच करत. अर्थात तो त्याचा प्रश्न आहे मी फक्त सांगितले.

तर मनःशांती बद्दल बोलत होतो. आपण कोण आहे आपली ताकद काय आहे आणि आपल्याला आपण जे करत आहोत ते झेपेल का स्वतःचे स्वतःच बघीतले पाहिजे म्हणजे आपण घोडचूक करत नाही ना हे पण बघीतले पाहिजे., तशी सततच्या कामामुळे क्षमता वाढतही जाते किंवा कमीही होते अर्थात ते त्या कामावर अवलंबून असते आणि ते त्या व्यक्तीवरही अवलंबून असते.

‘आपले कर्म करत रहा फळाची अपेक्षा ठेवू नका’, असे नेहमी म्हटले जाते. ह्याचा अर्थ आपण नेहमी आपआपल्या कुवतीप्रमाणे लावत असतो. गीतेत सांगितले आहे त्याप्रमाणे आपल्याकडून तसे होते का? गीतेत सांगितले त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थती यात फरक जाणवतो का? कितीतरी असे मुद्दे आहेत, गोष्टी आहेत त्याचा विचार आपण नव्याने करतो का?

कृष्णाने असे का म्हटले किंवा त्याचा परिणाम काय झाला हे सर्वाना माहीत आहे का? ह्या कालखंडात संयम नाही ठेवला तर काय फायदे होतात आणि काय तोटे होतात हे सांगण्यासाठी बाबा, स्वामी मंडळींची आपल्याला गरज का वाटते?

खूप प्रश्न आहेत ना…अहो ते प्रश्न आपणच निर्माण केले आणि आपणच सोडवू शकत नाही मग ही मंडळी आपल्याला कधी योगाचा किंवा मेडिटेंशन आधार घ्यावा असे सागतात. अन्न खाल्यानंतर आपण जे सुखावतो, तृप्त होतो तितकेच मेडिटेशन आपल्याला ऊर्जा देण्यासाठी का पुरत नाही?

ह्याचा कधी शोध घेतला आहे का?

अहो उत्तर साधे आहे एकदम आणि प्रत्येक बाबतीत तीनच शब्द आहेत. सगळ्याच बाबतीत…

आता खुप झाले?

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..