दरवर्षी २५ ऑक्टोबर रोजी जागतिक पास्ता दिवस साजरा केला गेला. जागतिक पास्ता दिवस सगळ्यात पहिल्यांदा १९९५ मध्ये साजरा केला गेला आणि तेव्हापासून तो दरवर्षी साजरा केला जातोय.
पास्ता हा शब्द एक इटालियन शब्द आहे ज्याचा अर्थ पेस्ट, गहू आणि पाणी असा होतो.
पिझ्झाप्रमाणेच पास्ता आता अनेकांना आवडतो. पास्ता आवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यात असणारं चीज आणि भाज्या. त्यामुळे वेगवेगळ्या आकारातील पास्ता खाऊन बघणे लोक पसंत करतात.
पास्ता हा प्रकार साधारणत: व्हाइट किंवा रेड सॉसमध्ये बनवला जातो. पण हल्ली त्यात विविध प्रयोग करून अनोख्या नानाविध चवींचा पास्ता सर्व्ह केला जातो.
पास्त्याचे डुरम व्हीट पास्ता, होल व्हीट पास्ता, पेनी पास्ता, मॅकरोनी पास्ता, रॅविओली पास्ता, फुसिली पास्ता, स्पॅगेटी पास्ता, लसानिया पास्ता, टॉर्टेलिनी पास्ता, लिन्गिन पास्ता, मल्टीग्रेन पास्ता असे अनेक प्रकार लोकप्रिय आहे.
इंटरनॅशनल पास्ता ऑर्गनायझेशननुसार, जगभरात पास्ताचे ६०० हून अधिक प्रकार आहेत. इटलीमध्ये राहणारे लोक सर्वात जास्त पास्ता खातात. इटलीतील सरासरी व्यक्ती दरवर्षी ५१ पौंड पास्ता खातो. जरी पास्ता हा इटलीमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक खाल्ली जाणारी डिश आहे, परंतु आता ती जगभरात प्रिय झाली आहे. भारतातही पास्ता हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकांचा आवडता खाद्य बनला आहे. मात्र, पास्ता खाल्ल्याने मुलांच्या आरोग्याला काही हानी पोहोचेल की नाही, याची चिंता पालकांना असते. हल्ली भारतात दरवर्षी १७ ऑक्टोबर हा ‘राष्ट्रीय पास्ता दिवस’ साजरा केला जातो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply