येहुदी मेनुहीन यांचा जन्म २२ एप्रिल १९१६ रोजी न्यूयॉर्क येथे झाला.
येहुदी मेनुहीन यांनी वयाच्या ४ वर्षा पासून व्हायोलीन शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या सातव्या वर्षी त्यांची पहिली कॉन्सर्ट झाली होती. येहुदी मेनुहीन १९५० मध्ये भारतात आले. १९५२ मध्ये येहुदी मेनुहीन व योगगुरु बीकेएस अय्यगार यांची भेट झाली.
येहुदी मेनुहीन यांनी अय्यंगार यांची पाश्चात्य जगाशी ओळख करून दिली आणि त्यांना युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये योगाबद्दल व्याख्याने देण्याची संधी दिली. तबला’ वादक चतुरलालना सरोदसम्राट अली अकबर खान १९५०च्या दशकात प्रथम अमेरिकेला आपल्याबरोबर घेऊन गेले. हा दौरा येहुदी मेनुहीन यांनी घडवून आणला होता. येहुदी मेनुहीन यांनी अल्लारखा, रविशंकर यांच्यासह अनेक ऐतिहासिक मैफीली केल्या होत्या. १९६८ साली इस्ट मिट वेस्ट या अल्बम साठी रविशंकर यांच्यासह येहुदी मेनुहीन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.
येहुदी मेनुहीन यांचे निधन १२ मार्च १९९९ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply