भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले एपीजे अब्दुल कलाम यांचा २०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने त्यांचा सन्मान करत त्यांचा ७९ वा वाढदिवस हा जागतिक विद्यार्थी दिन म्हणून जाहीर केला होता. त्या दिवसापासून जगभरात हा दिवस साजरा केला जातो.
१५ ऑक्टोबर १९३१ हा एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. या महान शास्त्रज्ञाने क्षेपणास्त्रात भारताला स्वयंपूर्ण केले. ते नेहमी विद्यार्थ्यांमध्ये रमले. आपल्या आयुष्यात कायम एक शिक्षक म्हणून मला ओळखले जावे अशी इच्छा डॉ. कलाम नेहमी बोलून दाखवयाचे.
त्यांना भारत सरकारने १९८१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते, त्यानंतर १९९० मध्ये इस्त्रो आणि डीआरडीओ मधील कामांबद्दल पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जागतिक विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply