३० ऑक्टोबर हा दिवस जागतिक काटकसर दिवस म्हणून पाळला जातो. यालाचा वैश्विक बचत दिन असेही म्हणतात. आपण करत असलेल्या दैनंदीन खर्चाला काट देणे व भविष्यासाठी बचत करून ठेवणे हा या मागचा उद्देश आहे.
आज जर काटकसरीचे जीवन जगून बचत केली तर उद्याच्या भविष्याच्या तरतून होईल व या काटकसरीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी निश्चितच मदत होईल. आपण करत असलेल्या दैनंदीन खर्चाला काट देणे व भविष्यासाठी बचत करून ठेवणे हा या मागचा उद्देश आहे. बचत मग ती कोणत्याही स्वरूपात करता येईल. अगदी स्वयंपाक घरापासून ते इंधन, पाणी, वीज, खरेदी, वाहन, भटकंती आदी विविध प्रकारांतून आपण बचत करू शकतो. अशी बचतीची वृत्ती ही आपल्याला पर्यायाने देशाला विकासाकडे नेत असते.
बचतीचा गुण तसा महिलांमध्ये जन्मजातच असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. घरातील ही गृहीणी खऱ्या अर्थाने लक्ष्मीच्या रूपाने आपला संसाराचा गाडा हाकत असते. भौतिक सुखाला तिलांजली देवून गृहिणी काटकसरीला महत्त्व देत असते. आणि भविष्यात जेव्हा केव्हा मोठे संकट उभे राहते तेव्हा ही गृहलक्ष्मी आपल्या परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहते. आपल्या आर्थिक परिस्थितीचे भान न राखता उधळपट्टी करणे म्हणजे भविष्य काळोख करणे ठरेल. खर्चाचे नियोजन न करता अशा पद्धतीने पैसे उडविले तर हातात काहीच शिल्लक राहत नाही़ पर्यायाने मग दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ येते. यासाठी अंथरूण पाहून पाय पसरविणे हिताचे ठरते. रुण घेवून सण साजरा करण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून उसणवारी नकोच.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply