नवीन लेखन...

जागतिक कासव दिन

जागतिक कासव दिन हा अमेरिकन लोक रेस्कू म्हणून दिवस साजरा करतात, आपले पूर्वज कासवाचा खूप सांभाळ करत. प्रत्येक विहीर, बारव, तळी, यात कासव असत पण आज चोरटी शिकार,व्यापार, पाण्याचा अभावामुळे त्यांची वसतीस्थाने नष्ट झालीत. आज चित्रातून कासव पहावी लागत आहेत.

कासव हा पाण्यात आणि जमिनीवर राहणारा उभयचर प्राणी आहे. जमिनीवर पाण्यात आणि समुद्रात कासवे राहतात. कासवाचे पोट आणि पाठ खूप टणक असते. समुद्रात राहणाऱ्या कासवांना मराठीत सागरी कासव असा शब्द असून त्याच्या सात प्रमुख जाती आहेत. भारतात त्यापैकी चार प्रकारची कासवे आढळतात. ऑलिव्ह रिडले कासव, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल, सागरी किंवा समुद्री कासव. ही भारताच्या पूर्व आणि पश्चिाम किनाऱ्यावर आढळतात. ऑलिव्ह रिडले ही कासवे तपकिरी रंगाची असून ती ओरिसाच्या गोहिरमाथा येथील सागर किनाऱ्यावर आढळतात. महाराष्ट्रात कोकणपट्टीतील समुद्र किनाऱ्यावरही ती आढळतात.

ग्रीन टर्टल म्हणजे हिरवे कासव. ते पिवळ्या, पांढऱ्या रंगाचे गुळगुळीत पोट असलेले व टणक पाठीचे दिसते. भारतात पूर्व व पश्चिम किनार्यारवर ते दिसून येते. हॉक्स बिल टर्टल म्हणजे चोचीसारखे तोंड असलेले कासव. याची लांबी १७० से.मी. व वजन ५०० ग्रॅम असते. पाठ मऊशीर आवरणाने झाकलेली असते. त्याचा जबडा कात्रीसारखा असतो. भारताच्या नकाशाच्या भूभागापासून थोडे दूर असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर ही कासवे आढळतात. कासवाच्या पाठीचा दागिन्यांसाठी वापर होत असल्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे. ‘वेळास’ येथे सागरी संवर्धन केंद्र आहे. वेळास हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड- दापोलीजवळ आहे. वेळास येथे ‘कासव महोत्सव’ही आयोजित केला जातो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी येथे ऑलिव्ह रिडले येथे कासवाचे प्रजनन व संवर्धन होते. जगामध्ये २२० कासवांच्या जाती सापडलेल्या आहेत. लेदर बॅक टर्टल हे सागरी कासव ३०० किलोग्रॅम वजनाचे असते. भूचर म्हणजे जमिनीवर अधिक काळ राहणारे कासव शंभर ग्रॅम वजनाचे असते. भारतात ‘ट्रायोनिक्स’ प्रजातीतील दोनतीन कासवे आढळतात. कासवांची दृष्टी तीक्ष्ण असते. त्यांना तिसरी पापणीसुध्दा असते. शेपटीच्या खालच्या भागात आतडे, मूत्रवाहिन्या व प्रजनन वाहिन्या असतात. कासवे ही ठराविकच काळात प्रजनन करतात असे नाही. मादी मागील पायांनी जमिनीत किंवा वाळूत खोल खड्डा खणून त्यात अंडी घालते. तसेच माती, वाळू आणि वनस्पतींनी अंडी झाकून टाकते.

कासवाची अंडी वाटोळी असतात. त्याचे कवच टणक असते. सागरी कासव एकाचवेळी पाच अथवा अधिक अंडी घालू शकते. जमिनीवर राहणाऱ्या कासवाची पिल्ले ४५ ते ५५ दिवसात म्हणजे सर्वसाधारणपणे दोन-तीन महिन्यात मातीतून वर येऊ लागतात. त्यावेळी आजूबाजूची वाळूमय जमीन थोडी हलू लागते. कासवाचे आयुष्य शंभर ते एकशे पन्नास वर्ष असते. भारतात कासवांपासून ढाली तयार केल्या जातात. ‘ऑलिव्हर रिडले’ या कासवाच्या दुर्मीळ प्रजातीचे मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून होणारे मृत्यू रोखण्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजिकल मेट्रॉलॉजी’ (आयआयटीएम) मधील शास्त्रज्ञांनी बंगालच्या उपसागरातील त्यांची आयुष्यरेषा शोधली आहे. इंग्लंड येथून निघणाऱ्या ‘मॉरिने डिओसीसी’ या जागतिक नियतकालिकात ही संशोधनपर माहिती प्रसिध्द झालेली आहे. कासव हा वन्यप्राणी असून त्याला घरात जिवंत ठेवणे, बंदिस्त करणे हा गुन्हा आहे़ वन्यसंरक्षण कायदा १९७२ अन्वये कलम ९ नुसार संबंधितांवर कारवाई होऊ शकते़ नागरिकांनी समोर येऊन तक्रार करणे महत्त्वाचे आहे़ सुखसमृध्दीसाठी कासव घरात फीशपॉटमध्ये ठेवणे कायद्याने गुन्हा आहे.

आज जागतिक कासव दिना निमित्ताने आपण सर्व मिळून कासव संवर्धनाचे काम हाती घेऊ.

संकलन: संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..