पर्यटन!बर्याच जणांचा जिव्हाळ्याचा विषय. हे एकमेव असं क्षेत्र आहे ज्यात बर्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. सध्या कोविड महामारीने समस्त जग त्रस्त आहे. नाहीतर साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते फेब्रुवारी हा सर्वसाधारण भटकंतीचा काळ असतो.
मंडळी माझ्यामते जीवन ही एक भटकंतीच आहे. मनुष्यप्राणी आयुष्यभर वणवण करत भटकतच असतो आणि ही वणवण केली तरच तो जगू शकतो. माणसाने स्वत:ला वेळ द्यायलाच पाहिजे. तो वेळ जर त्याने भ्रमंतीसाठी खर्च केला तर अधिक समाधान त्याला मिळू शकते. फिरल्यामुळे माणसच्या मनात सकारात्मक विचार फिरु लागतात. एक ऊर्जा त्याला पुढील आयुष्याच्या प्रवासाकरिता प्राप्त होते. बरं फिरत असताना तुम्हांला कोणाची सोबत हवीच असं काही नाही , तुम्ही जर एकट्याची सोबत एंजॉय करु शकत असाल तर, तुम्ही एकट्यानेही जगभर प्रवास करु शकतात. याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. संपूर्ण जगाची संंस्कृती , परंपरा तुम्हांला कळू शकते आणि एक वेगळाच दृष्टीकोन तुम्हांला प्राप्त होऊ शकतो.
सध्याच्या काळात बर्याच लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. पुढे कुटुंब कसं चालवायचं हा प्रश्न आ वासून पुढ्यात उभा आहे. अशावेळी आपण जर या क्षेत्राकडे वळलो तर पुढे रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध होऊ शकतात. आताचा वेळ जर सत्कारणी लावला तर नक्कीच प्रगती होऊ शकते. आता मिळणार्या वेळात जर आपण परदेशी भाषा जर शिकलो तर परदेशातून आपल्या इथे येणारे पर्यटकांना आपण सगळी माहिती इत्थंभूतपणे देऊ शकू. जर आपण परदेशी भाषा शिकलो तर आपण त्याचे शिकवणी वर्गही घेऊ शकतो. आजकाल तंत्रज्ञान खूप प्रगत झालेले असल्याने तुम्ही हे वर्ग ऑनलाईन पद्धतीनेही घेऊ शकता. चला तर लागूया कामाला.
आज दिनांक २७ सप्टेंबर आहे. आजच्याच दिवशी १९७० रोजी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची (UNWTO) स्थापना झाली होती. १९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली. याच दिवसाचे औचित्य साधून हा लेख लिहिला आहे. सगळ्यांना पर्यटन दिनाच्या खूप शुभेच्छा.
— आदित्य दि. संभूस
#World Tourism Day
Leave a Reply