नवीन लेखन...

जागतीक पर्यटन दिवस

नेदरलॅन्ड मधील एक शहर आइंडहोवन

जागतीक पर्यटना दिना निमीत्ताने नेदरलॅन्ड मधील एक शहर आइंडहोवन ची ओळख.

‘पवनचक्क्यांचा देश’ ही सामान्यपणे हॉलंडची वर्षानुवषीर्ची ओळख नेदरलँड्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नेदरलँड्स मध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत. नेदरलँड हा एक अजब आणि तरीही नितांतसुंदर देश आहे. नेदरलँड हा देश इतका लहान आहे की युरोपच्या नकाशावर तो केवळ एका लहान ठिपक्याएवढा दिसतो. अजब अशासाठी की, या देशात बराचसा भूभाग समुद्रसपाटीच्या खाली असूनही कल्पक डच लोकांनी मोठय़ा हिकमतीने ठायी ठायी ‘डाइक्स’ (बांध) बांधून समुद्र अडविला आहे आणि समुद्राच्या भरती-ओहोटीमुळे येणाऱ्या जादा पाण्याचे नियमन करण्यासाठी देशभर कालव्यांचे जाळे विणले आहे.

नेदरलँडला भेट देणारे भारतीय पर्यटक अ‍ॅमस्टरडॅम, हेगचा ‘मदूरोडॅम मिनी पार्क’ आणि कुकेनहॉफ टय़ुलिप गार्डन यापलीकडे सहसा जात नाहीत; पण हॉलंडमधील इतर अनेक शहरे व गावे तितकीच प्रेक्षणीय आहेत. आइंडहोवन त्यापैकीच.

आइंडहोवन हे गाव रेल्वेने अ‍ॅमस्टरडॅम (शिफॉल) विमानतळापासून रेल्वेने किंवा कारने दीड तासाच्या अंतरावर आहे.

सुसज्ज रेल्वे असल्याने रेल्वेप्रवास इथे अगदी आरामदायक आहे. सकाळच्या गर्दीची वेळ असेल तर एका डब्यात फार फार तर ८/१० माणसांनाच उभे रहावे लागते. गर्दी नसल्याने लोक सायकलीही याच पॅसेंजर डब्यांतून नेतात. इतर वेळी संबंध डब्यांमध्ये १०/१२ माणसेच विखरून बसलेली दिसतात. दुसऱ्या वर्गाचा डबा देखील आपल्या पहिल्या वर्गाच्या डब्यासारखाच आरामदायी असतो. इथे दोन प्रकारच्या गाड्या आहेत. एक तीन डब्यांची जी ५/६ स्थानकांदरम्यानच धावते व एक आपल्यासारखी ८/९ डब्यांची जी लांब पल्ल्यासाठी असते. शाळांबद्दल म्हणाल तर डच शाळा फुकट. इंटरनॅशनल स्कुल साठी फी बऱ्या पैकी. इंग्रजी भाषा ही येथे शाळेपासूनच सेकंड लँग्वेज म्हणून शिकविली जात असल्याने येथील लोक खुषीने इंग्रजी बोलतात म्हणून आपल्यालाही फिरताना किंवा व्यवहारांत कोणतीही भाषेची अडचण येत नाही. पण डच लोकं सुरवातीला डच मध्येच आपल्याशी बोलतात, आपण प्लिज इंग्लीश असे बोललो तरच डच लोक इंग्रजी बोलतात.

आइंडहोवन स्टेशनची पूर्ण इमारत ही ट्रांझिस्टरच्या आकाराची बनविली आहे. ज्यात आपल्याला चौकोनी स्पीकर, गोल बटणे, एरियल वगैरे आकार स्पष्ट दिसतात. मि. फिलिप्स यांचा पुतळादेखील या स्टेशनसमोर उभारला आहे. काही लोक असे म्हणतात की फिलिप्सच्या पहिल्या फॅक्टरीची रचना व बांधणी हीच प्रमाण मानून तशाच इतर देशांतल्या फॅक्टरीज् बांधण्यात आल्या. आणि ही रचना व बांधणी योगायोगाने वास्तुशास्त्राच्या तत्त्वांनुसार शास्त्रशुद्ध अशी होती आणि त्यामुळेच या कंपनीला अभूतपूर्व यश पहायला मिळाले. या संपूर्ण गावात फिलिप्सच्या अनेक प्रचंड मोठ्या इमारती ठिकठिकाणी विखुरलेल्या आहेत. (लाइटिंग डिव्हिजन, मेडिकल इलेक्ट्रॉनिक डिव्हिजन, वगैरे) ज्यात एकेकाळी शेकडो माणसे काम करीत होती. यांतील काही इमारती आज कंपनीने काही कारणाने विकून टाकल्या असून त्या पाडण्याचे काम काही ठिकाणी चालू असल्याचे दिसले. येथे फिलिप्सने बांधलेले एक मोठे फुटबॉल स्टेडियम आणि त्याच्या बाहेरील फुटबॉल खेळणाऱ्या दोन खेळाडूंचे पुतळेही पहाण्यासारखे आहेत.

युरोचा रूपयात बदल करून विचार केला तर पेट्रोलचा भाव १५० रू. लिटर असून तो रोज काही सेंट्सनी बदलत असतो. पण १ रू. म्हणजे १ युरो असे मानले तर ५००० युरो पगारामध्ये इथला माणूस खाऊन पिऊन गाडी ठेऊ शकतो. डच माणूस काय खातो व पितो तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे चिकन, हॅम, बीफ याचे तुकडे ते ब्रेडमध्ये भरून खातात. तेच त्यांचे दुपारचे जेवण. भाज्या वगैरे रात्री खात असावेत. पिणे म्हणाल तर बियरचे अनेक प्रकार तेथे आहेत. बहुतेक बियर आपल्यापेक्षा माइल्ड असतात व त्या रोजच्याच सवयीच्या असल्याने इथल्या लोकांना हँगओव्हर येत नसावा. (बियरला इथे दारू समजत नाहीत).व्हिस्की व इतर मद्याचेही भारतात न पाहिलेले अनेक ब्रँन्ड येथे पहायला मिळतात.आइंडहोवनमध्ये वाण्याची किंवा भाजीवाल्यांची अशी ठराविक जागी छोटी दुकाने नाहीत. पण इंडियन स्टोअर्स अशी काही दुकाने आहेत की ज्यात भारतीय वस्तू, मसाले अगदी चुना, कात सुध्दा मिळतो. पुर्ण नेदरलॅन्ड मध्ये आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरतो. आइंडहोवन मध्ये ट्युस डे मार्केट हे सेंट्रम या ठिकाणी तर सट र्डे मार्केट दुस-या ठिकाणी.

ट्युस डे मार्केट मंगळवारी व सॅटर्डे मार्केट शनिवारी अगदी वर्षभर भरतात. हे अगदी आपल्याकडे आठवड्याचा बाजार असतो तसेच असते. ट्युसडे मार्केट ताज्या भाज्या, फळे, चिकन, मासे, फुले,कपडे, रोजच्या लागणाऱ्या गोष्टी, रेडी टु इट फुड वगैरे अनेक गोष्टी मिळतात. सॅटर्डे मार्केट मध्ये ताज्या भाज्या, फळे, मास, मासे, फुले वगैरे सर्व मिळते. भाज्या व फळे हे इथला शेतकरी व त्याची बायको, मुलगा, मुलगी हे सर्व त्यांच्या स्टेशन वॅगनमधून घेऊन येतात.स्टेशन वॅगनच्या मागच्या ३ बाजू उघडल्या की दुकानाचा प्लॅटफॉर्म झाला तयार. शेतातून डायरेक्ट आल्यामुळे भाज्या व फळे इतकी ताजी असतात की ती सर्वच आपल्याला घ्यावीशी वाटतात. ताजी फुले तर येथे खूप खपतात.

वेगवेगळया प्रकारची अतिशय आकर्षक फुले येथे कुंड्यांमधून विकली जातात. लोक ७/८ दिवस ही रोपे ठेवतात व पुढच्या आठवड्यात वेगळ्या प्रकारच्या फुलांची नवीन कुंडी घेतात. ज्यांची घरे तळमजल्यावर आहेत त्यांना बागा ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे प्रत्येक घरासमोर आपल्याला चांगली फुललेली बाग पहायला मिळते.

इथली तरुणाई स्वतंत्र आणि स्वावलंबी विचारांची आहे. शैक्षणिक सुट्टीत इथली मुलं आवर्जून जॉब करतात. कोणतंही काम हे काम आहे, त्यात छोटं-मोठं वगैरे काही नसतं, ही त्यांची मानसिकता असते. कामाच्या वेळी काम आणि वीकएण्डला पार्टीज एन्जॉय करतात. लोक कुटुंबाला प्राधान्य देतात. लहान मुलांना सहा वर्षांपर्यंत शाळेत घातलं जात नाही. मुलांना त्यांच्या कलाप्रमाणं वागवलं जातं. पालकही मुलांच्या बरोबरीने सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होतात. मग ते मैदानी खेळ असोत किंवा पुस्तक वाचणं असो.. अलीकडे आपल्याकडे अनेकदा पालक आणि मुलं समाजमाध्यमांवर सर्रास, सतत व्यग्र असतात, तर इथले पालक आणि मुलं स्वत: पुस्तक वाचतात आणि मुलांनाही पुस्तक वाचायला देतात. फोनचा वापर हा गरजेपुरताच केला जातो.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..