शाकाहारी म्हटंल की काही जणांना वाटतं कसं शक्य आहे तर काही जणांना वाटतं हेच आरोग्यासाठी चांगले आहे.
मात्र आज जागतिक शाकाहारी दिवस आहे, कोणी शाकाहारी असो किंवा नसो आजचा हा दिवस सर्वांनीच साजरा करावा.
ऑक्टोबर महिना हा शाकाहारी जागरूकता महिना म्हणून सुरू होतो, शाकाहारीपणाचा आनंद, करुणा आणि आयुष्य-वाढावे या संभाव्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक शाकाहारी दिवस स्थापित करण्यात आला आहे.
शाकाहारी जीवनशैलीच्या फायद्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि इतरांना शाकाहारी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो, मात्र शाकाहारी जीवनशैलीचीही वेगवेगळी कारणे आणि वेगवेगळे प्रकार आहेत.
काही लोक त्यांच्या भुकेसाठी प्राण्यांची हत्या न करण्याचा दृढनिश्चय करतात, तर काही लोक आरोग्याच्या कारणांमुळे शाकाहारी आहाराचा वापर करतात. शाकाहारी आहाराव्यतिरिक्त, येथे विविध प्रकारचे शाकाहारी आहार देखील आहेत.
शाकाहारी आहारांचे प्रकार :
व्हेगन-वेजीटेरियन:
या आहारात फक्त वनस्पती-आधारित अन्न समाविष्ट आहे. यात कोणत्याही प्राणी प्रथिने किंवा प्राणी-उत्पादने जसे की अंडी, दूध किंवा मध या पदार्थांचा समाविष्ट नसतो. यामध्ये सामान्यतः कच्ची फळे, भाज्या, शेंगा, अंकुर या पदार्थांचा समाविष्ट असतो.
लॅक्टो–वेजीटेरियन:
यामध्ये वनस्पती अन्न आणि दुग्धजन्य पदार्थांचा समाविष्ट असतो परंतु यामध्ये अंडीचा समाविष्ट नसतो.
लॅक्टो-ओवो वेजीटेरियन:
यात वनस्पती खाद्य, डेअरी उत्पादने आणि अंडी या पदार्थांचा समाविष्ट असतो.
शाकाहारी बनण्याचे फायदे
यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. ते चयपचय वाढवते आणि त्यामुळे शरीराचे वजन कमी करण्यास मदत होते.
शाकाहारी आहारांमध्ये संपूर्ण धान्य, शेंगदाणे, फळे आणि भाज्या समाविष्ट आहेत, जे फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे तसेच आवश्यक खनिजे पुरवतात.
आपल्या शरीराची चरबी कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मांस टाळणे.
मांसाहारी जेवणांच्या तुलनेत कोलेस्टेरॉलची पातळी शाकाहारी भोजनांमध्ये खूपच कमी आहे.
एक योजनाबद्ध शाकाहारी आहार मुले, स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींसह, सर्व वयोगटातील लोकांचे पोषण आवश्यकता पूर्ण करू शकतो.
आपल्याला आपल्या शरीराच्या पौष्टिक गरजांची जाणीव असणे आवश्यक आहे, त्यानुसारच आपण आपला आहार तयार करावा.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply