
जागतिक व्हिस्की दिवस हा २०१२ पासून मे महीन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
व्हिस्की ही प्रामुख्याने बार्ली या धान्यापासून बनवली जाते. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. भारतीय व्हिस्की प्रामुख्याने ज्वारी आणि साखरेची मळी ह्या पासून बनवितात. व्हिस्कीचे दोन प्रकार असतात.
सिंगल मॉल्ट व्हिस्की व ब्लेन्डेड व्हिस्की.
सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच प्रांताच्या, परगण्याच्या, एका प्रकारच्या आणि एकाच प्रतीच्या कड्धान्यापासून, एकाच डिस्टीलरीमधे केलेली उच्च दर्जाची व्हिस्की. भारतात स्कॉच व्हिस्की आयात करून बाटल्या मध्ये भरली जाते. यात सिग्राम ची पासपोर्ट (Passport), 100 पाइपर्स (100 Pipers) व समथिंग स्पेशल (Something Special); हेग (Haig), हेजेस एंड बटलर (Hedges & Butler), ब्लैक एंड व्हाइट (Black & White), ब्लैक डॉग (Black Dog), टीचर्स (Teacher’s), जे एंड बी (J & B), व्हाइट एंड मैके (Whyte & Mackay) . हल्लीच सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की भारतात मिळू लागली आहे जसे की – डालमोर (Dalmore), आइल ऑफ़ जुरा (Isle of Jura), ग्लेन ड्रूमंड (Glen Drummond) . ब्लेन्डेड व्हिस्की म्हणजे ही मॉल्ट आणि नॉन मॉल्टेड धान्यांच्या मिलाफापासून (ब्लेन्ड) बनवतात. ह्या धान्यांची प्रत वेगवेगळी असतेतसेच वेगवेगळ्या डिस्टीलरींमधे डिस्टील केलेल्या दर्जेदार व्हिस्कींचा मिलाफही असू शकतो. टीचर्स, ब्लॅक लेबल, शिवास रीगल हे काही ब्लेन्डेड व्हिस्कीचे ब्रॅंड्स.
स्कॉटलंडमध्ये तयार झालेल्या व्हिस्की लाच स्कॉच व्हिस्की असे म्हणतात. स्कॉच व्हिस्की डिस्टील केल्याचा सर्वात जुना दस्तावेज १४९४ मधील आहे. भारतात बंगलुरू येथील अमृत (Amrut) डिस्टलरी हे एकमेव सिंगल माल्ट व्हिस्की उत्पादक आहेत.
जागतिक व्हिस्की दिवसाच्या निमित्ताने भारतातील पॉप्युलर व्हिस्की ब्रँडची माहिती.
इंडियन मेड फॉरेन लिकर असे ही याला म्हणतात.
मॅकडोवेल नं १ (McDowell’s No.1)
हा देशातील सर्वात जास्त विकला जाणार व्हिस्की ब्रँड आहे. यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडचा हा ब्रँड असे ही कंपनी UB ग्रुप चालवते. 1968 मध्ये हा ब्रँड बाजारात उतरवला होता.
मॅकडोवेल नं १ चे बाजारात विविध प्रकार उपलब्ध आहे.
मॅकडोवेल नं १ रिझर्व
मॅकडोवेल नं १ रिझर्व डायेट मेट
मॅकडोवेल नं १ प्लॅटीनम
ऑफिसर्स चॉइस (Officer’s Choice)
‘ऑफिसर्स चॉइस’ हा देशातील दुसर्यार क्रमांकाचा व्हिस्की ब्रँड आहे. या ब्रँडचा मालकी हक्क किशोर छाबरिया यांच्या अलाइड ब्लेंडर्स अॅण्ड डिस्टिलर ग्रुपकडे आहे.
बॅगपाइपर (Bagpiper)
‘बॅगपाइपर व्हिस्की’ हा ‘यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड’चा ब्रँड आहे. ‘बॅगपाइपर व्हिस्की’चा जगातील टॉप 100 ब्रँड्स्मध्ये समावेश आहे.
रॉयल स्टॅग (Royal Stag)
‘रॉयल स्टॅग’ या ब्रँडचा मालकीहक्क फ्रेंच कंपनी ‘पेर्नोड रिकार्ड’कडे आहे. 1995 मध्ये सीग्राम कंपनीने हा व्हिस्की ब्रँड बाजारात उतरवला होता. ‘रॉयल स्टॅग’मध्ये कोणतेच आर्टिफीसियल फ्लेवर नाही आहे.
ओरिजिनल चॉइस (Original Choice)
‘ओरिजिनल चॉइस’हा गोव्यातील ‘जॉन डिस्टिलरीज’चा एक लोकप्रिय ब्रँड आहे. जॉन डिस्टिलरीजचा हा ब्रँड वादाच्या भोवर्याोत सापडला होता.
ओल्ड टेवर्न (Old Tavern)
टॉप इंडियन व्हिस्की ब्रँडमध्ये ‘ओल्ड टेवर्न’सहव्या क्रमांकावर आहे. ओल्ड टेवर्न व्हिस्की देशातील बिहार व उत्तरप्रदेशातील सर्वात पॉप्युलर ब्रँड आहे. काही आफ्रिकन देशांमध्येही हा ब्रँड फेमस आहे.
इम्पीरियल ब्लू (Imperial Blue)
‘इम्पीरियल ब्लू’ला ‘सीग्राम्स इम्पीरियल ब्लू’ असेही म्हटले जाते. इंडियन व्हिस्की मार्किटमध्ये हे नाव खूप प्रतिष्ठित आहे.
ह्यावर्ड्स फाइन (Haywards Fine)
‘ह्यावर्ड्स फाइन’ हा देखील विजय माल्या यांची कंपनी UB Group चा एक पॉप्युलर ब्रँंड आहे. इकॉनॉमी व्हिस्की कॅटेगरीमधील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे.
8 PM
8 PM हा प्रसिद्ध कंपनी Radico Khaitan चा एक फेमस इंडियन ब्रँड आहे. Radico Khaitan आधी ‘रामपूर डिस्टिलरी अॅण्ड केमिकल कंपनी या नावाने ओळखली जात होती.
डायरेक्टर्स स्पेशल (Director’s Special)
‘डायरेक्टर्स स्पेशल’ हा युनाइटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनीचा ब्रँड आहे. ही कंपनी युनाइटेड ब्रेव्हरीज ग्रुपचा (UB) एक पार्ट आहे. जागतिक क्रमवारीत ‘डायरेक्टर्स स्पेशल’चा ४४ वा क्रमांक लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply