दर वर्षी ८ मार्चला सर्व जगभर जागतिक महिला दिन मोठया प्रमाणावर साजरा केला जातो पण महिलांचे सर्व प्रश्न सुटतात का? असो.आपल्या देशातील स्त्रियांना पुराणकाला पासून ते आजतागायत एक सांस्कृतिक वलय, मर्यादा, शिस्त आणि बंधने आहेत. या उलट आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जगात महिलांनाचे स्थान काय आहे हे बघणे जास्त संयुक्तिक ठरेल पण यासाठी भारतीय नारीला भारतात काय स्थान आहे हे बघणे त्याहूनही जास्त प्रशस्त आहे कारण ज्या देशात आपण राहातो व्यवहार करतो व आपले नातेसंबंध त्या देशातील नागरिकांशी असल्याने तेच जास्त सखोल बघणे योग्य ठरेल.कित्येक वर्षे आपला देश सर्व जाती, धर्मसंस्कृति, निरनिराळे आचार विचार आणि पंथ यांना घेऊन गुण्यागोविंदाने नांदत आहे आणि नांदणार आहे. काही ठिकाणी हेवेदावे आहेत पण व्यक्ति तितक्या प्रकृती बघून सोडून द्यावे लागेल. भांडयाला भांडे लागले की आवाज हा होणारच. म्हणून काही सदोदीतच असे होते असे नाही. एक लोकाशाहीवादी व लोकसत्ताक राज्य म्हणून सर्व जगासमोर आपण याचे एक आदर्श उदाहारण ठेवले आहे. आणि हेच काही ठरावीक देशांच्या डोळयात सलते आहे आणि आपल्यात फुट पाडून त्यांचा डाव यशस्वी करण्याकडे कल आहे तो आपण सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे. आपल्यातील एकजुटीने हे सर्व शक्य आहे.भारत देशातील नारी म्हंटले की सर्वांच्याच भुवया कमानदार होतात. कारण भारतातील स्त्री म्हंटले की एक बुरसट विचारांची गलिच्छ अशिक्षित घाबरट आणि दबून राहाणारी अश्या कल्पना असलेली स्त्री होती पण आता समाज बदलत चालला आहे.प्रसार माध्यमातील नवनविन शोधाने देशादेशांतील अंतर कमी होऊन देश जवळ येत आहेत. देशांदेशांतील महिलांना सुरक्षेसाठी व सबलीकरणासाठी दिल्या गेलेल्या सुविधा व त्याची कठोर अम्मलबजावणी. भारतीयांची स्त्रीकडे बघण्याकडे बदलेली दृष्टी िचा
धारा प्रेम व सरकारचा महिलांच्या सबलीकरणाकडे बघण्याचा दृष्टीकोन.
स्त्रीयांप्रती प्रसार माध्यमातून सकारात्मक सांस्कृतिक व सामाजिक देवाण घेवाणीत वाढ होत आहे. या सर्व बदलांचा चांगला परिणाम भारत देशातील स्त्रीकडे वेगळया दृष्टीने बघण्यात होत आहे. आपल्या देशातील महिलांसाठी आदर्शवत कायदे करण्यात येत आहेत. त्यांच्या सर्वांगिण उन्नत्तीकडे लक्ष दिले जात आहे. आपल्या देशातील महिला विशेषतः तरूण महिला सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खादां लाऊन आघाडीवर आहेत. हे सगळे होत असले तरी आज आपल्या देशातील महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न अनुत्तरीतच राहातो. आपल्या देशातील महिलांवर होणारा आत्याचार, हुंडाबळी, शोषण व इतर जाच हे कश्याचे द्योतक आहेत ? एखाद्या देशातील महिला किंवा आपल्या देशातील महिला यानातून जाऊन आली विमान चालवले रेल्वे इंजिन चालवले किंवा इतर साहस केले तरी तिचे समाजातील स्थान काय हे कोणी बघीतले आहे का ? तिला योग्य न्याय मिळतो का ? ती सुरक्षीत आहे का ? एकटीदुकटी रस्त्याने रात्री फिरू शकते का ? या प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर आपल्या सर्वांना अंतर्मुख होऊन जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बघावे लागेल व कायद्यात व समाज व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडवून आणावे लागतील. वैचारीक मानसिकता बदलावी लागेल.
आपली भारतीय संस्कृती महिलांप्रति कीती जागृक आहे हे कळते. परंतू आंम्ही हे सगळे वाचतो, पण आचरणात आणतो का हे महत्वाचे आहे नुसते कायदे करून चालणार नाही तर महिलांप्रति आदर व मान सन्मान दिला गेला पाहिजे.
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply