१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका)
तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला ‘ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग’ म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ १०० वर्षांपूर्वी याची बांधणी झालेली आहे. या कामाचे नकाशे १८५१ सालापासून आखण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामास १८७० साली सुरुवात झाली व ४० वर्षांनी काम पूर्ण झालं. यासाठी अंदाजे दहा हजार कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. या मार्गावर ६९ बोगदे, ५८ पूल आणि २१ अतिशय कठीण वळणं आहेत. गलेरा हे सर्वांत उंचावरील स्थानक बोगद्याच्या आतच आहे. १०,२८० फूट उंचीवरील पूल दोन अजस्त्र शिलांमधील बोगद्यांच्या मध्यात असून, त्यांच्या खाली प्रचंड खोल घळ आहे.
२. सैतान वा भुताच्या नाकासारखी बांधलेली रेल्वे (इक्वेडोर – दक्षिण अमेरिका)
हा जगातील सर्वांत कठीण, खडतर रेल्वेमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गायाक्विल शहर आणि राजधानी क्वीट यांना जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या आखणीस २५ वर्षे लागली आणि १८९९ मध्ये काम सुरू झालं. त्यानंतर २० ते २५ वर्षांनंतर हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाला. वाटेतील एका सरळसोट अजस्र शिळेमधून अनेक वळणांचा मार्ग खोदण्यात आला आहे. चढण १:१८ हिशोबाने छाती दडपून टाकणारी आहे. सर्वांत उंच जागेस EI Noriz del Diablo (The Devil’s nose) म्हणतात. १२ कि.मीटरचा उतरणीचा रस्ता १९९७ च्या भूकंपात उद्ध्वस्त झाला होता.
३. क्विंगानी तिबेट हेवी रेललाईन
(या मार्गाची माहिती तिबेट रेल्वे प्रकरणात दिलेली आहे.)
४. यिवान रेल लाईन तिबेट (यिचाँग टू चाँगींग-वांझाऊ)
३७७ कि.मी. लांब असलेला हा सर्वांत कठीण व अतिशय महाग रेल्वे प्रकल्प आहे. एक कि. मी. बांधण्यासाठी ९ मिलियन डॉलर्स या हिशोबाने या रेल्वे प्रकल्पाचा खर्च एकूण ३.४१ बिलियन डॉलर्स झाला आहे. ५० हजार कामगार या कामासाठी ७ वर्षं झटत होते. या मार्गावर २५३ पूल व १५९ बोगदे आहेत.
५. आल्प्स ट्रान्झिट रेल (स्वित्झर्लंड)
(न्यू रेल लिंक थ्रू आल्प्स माउंटन्स)
या मार्गाचं काम सन २०१६ पर्यंत पूर्ण होईल अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे. यासाठी १३ बिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. सर्व रुळांचं जाळं खोल जमिनीखाली, बोगद्याच्या शेकडो मीटर खाली आहे. हे बोगदे १९१० सालात बांधलेले होते. जगातील सर्वांत लांब बोगदा ५७ कि.मीटर असून, गोथार्ड या नावाने या रेल्वे मार्गावर असणार आहे.
Leave a Reply