दिनदर्शिकेचा इतिहास इनिहा, मानवाने शेतकरी म्हणून जीवनास सुरूवात केली तेव्हापासून अस्तित्त्वात आला. त्यापूर्वी त्याला ऋतू आणि त्यांचा काळ आणि क्रम याबद्दल फारसे ज्ञान नव्हते. हिवाळ्यानंतर हवामानात ऊब येऊन झाडांना पाने-फुले येऊ लागतात हे देखील त्याला फार उशीरा कळले.
6000 वर्षांपूर्वी इजिप्ती शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवातून काही अंदाज केले. नाईल नदीच्या काठावर त्याची शेते होती आणि त्यांना कळून चुकले होते की नाईल नदीला नियमितपणे पूर येतो. पूर ओसरल्यानंतर शेतात चिखलाचे थर जमा होतात. त्यावेळी पेरणी केली तर भरघोस पीक घेता येते. त्यांच्या हेही लक्षात आले की जेव्हा सूर्योदयापूर्वी व्याधाचा तारा पूर्व क्षितीजीवर दिसू लागतो या काळात नाईल नदीला पूर येतो.
इजिप्ती धर्मगुरूंनी व्याधाचा तारा दिसू लागतो तेव्हापासून दिवसांची संख्या मोजली. तेव्हा त्यांना आढळले की 365 दिवसानंतर तो पुन्हा पूर्व क्षितिजावर दिसू लागतो. तेव्हाच एक वर्षाचे 365 दिवस हे गणित त्यांना समजले.
आकाशातील दुसरे नियमित चक्र म्हणजे चंद्राच्या कला.gf एकदा चंद्रकोर दिसली की पुन्हा तशीच चंद्रकोर दिसणाऱ्या काळाला त्यांनी एक चक्र समजले तर एका वर्षात अशी 12 चक्रे पूर्ण होतात. म्हणून 30 दिवसांचा एका चक्राला एक घटक मानले. पुढे या एका घटकाला Moonth हे नाव मिळाले त्याचा अपभ्रंश Month असा झाला.
वर्षाच्या जादा 5 दिवसाचे मात्र काय करायचे हे त्यांना समजले नाही.
ख्रिस्तपूर्व 4236 या वर्षापासून ही दिनदर्शिका अस्तित्वात आली असे मानतात.
बारपृष्ठी पंचकोनीय धन:
ग्रीक गणितज्ज्ञांच्या असे लक्षात आले की 12 समभुज पंचकोन भुजांवर एकमेकांस चिकटविले तर बारापृष्ठांचा एक धन तयार होतो. याला म्हणजे पंचकोनीय बारपृष्ठी घन असे म्हणता येईल. या घनाचा वापर करून त्यांनी वर्षाच्या बारा महिने दिवसांच्या नोंदी ठेवल्या.
मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकाच्या मार्च 2003 च्या अंकातून साभार..
Leave a Reply