आपल्याकडे दरवर्षी नेमके पावसात किंवा पावसाच्या आधी रस्ते खराब होत असतात. खड्डे पडतात. प्रवासाला निघतांना आपण म्हणतो “ पावसाचे दिवस आहेत, रस्ते खराब झाले असणार – लवकर निघूया.“ अशी मानसिकता आपल्यात का आली? आपण मान्य करून घेतले कि पावसात रस्ते खराब असायलाच हवेत. परदेशी पण बर्यापैकी पाऊस पडतो तेथे का नाही रस्ते खराब होत?
खराब होणारे रस्ते पाहून मला पडलेले काही प्रश्न
– रस्ते प्रत्येक वर्षी खड्ड्यात का जातात?
– एवढे खड्डे रस्त्याला का पडतात?
– रस्त्यात खड्डे असतात कि खड्ड्यात रस्ते?
– बोटीत बसत नाहीत एवढे धक्के आणि हेलकावे ह्या रस्त्यावरून जातांना का बसतात?
– खड्ड्यामुळे इंधन आणि वेळ जास्त लागतो आणि गाडी खराब होते ह्याला जबाबदार कोण?
– खड्ड्यांमुळे अपघात होतात, लोक जखमी होतात आणि कधी कधी काही लोक जीव गमावतात, त्याला जबाबदार कोण?
– मंत्री आणि संत्री ह्या रस्त्याने प्रवास करतात का? की त्यांना सचिव सांगतात “साहेब रस्ता खराब आहे, हेलिकॉप्टर ने जा“
– रस्ते असे दरवर्षी खराब होऊ नये म्हणून सरकारतर्फे काय उपाययोजना केली जाते? ती व्हावी म्हणून स्थानिक संस्थाकडून आणि जनतेकडून सरकारची काय अपेक्षा आहे?
– रस्ते खराब झाल्यास ठेकेदारांकडून पेनल्टी घेण्याची काय तरतूद आहे? अशी तरतूद आहे का?
– जनतेकडून रोड टॅक्स, टोल घेतला जातो, नोकरदार आयकर भरतात त्याबदल्यात चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का ?
– जर पावसात रस्ते खराब होतात तर पावसाच्या आधी मार्च एप्रिल मध्ये हे सगळे रस्ते टकाटक का केले जात नाहीत? भर पावसात, रहदारी चालू असतांना खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रकार का केला जातो?
– खराब रस्त्यामुळे साधन संपत्तीचा किती अपव्यय होतो ह्याचा हिशोब कधी कोणी ठेवलाय का ?
अशा रस्त्यावरून परदेशी प्रवाशी प्रवास करताय तेव्हा ते राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. ज्या देशात दळणवळण करणारे महामार्ग असे आहेत तो देश महासत्ता कसा आणि कधी होणार?
प्रकाश दिगंबर सावंत, पुणे
९०४९००८५०३