लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांचा जन्म ७ जून १९८५ रोजी झाला.
प्राजक्त देशमुख हे तरुण नाशिक मधले तरुण व्यवसायिक आहेत. प्राजक्त देशमुख यांची सौर उपकरणांचे उत्पादन घेणारी “सोलर एनर्जी प्रा.ली”. ही त्यांची कंपनी, पण प्राजक्त यांची ओळख या व्यावसायापुरती मर्यादित राहात नाही. एक चांगले व्यवसायिक असण्यासोबतच ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन अभिनयाकरिता ओळखतात. नाशिकच्या अश्वमेध थिएटर्स ह्या संस्थेतुन रंगभुमीवर कार्यरत आहेत. अश्वमेधच्या माध्यमातून त्यांनी सहर, पाणीपुरी, मिडनाईट शो, वन्स अपोन अ टाईम या सारख्या एकांकिकांमधून त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शन केले. त्यांच्या सम्थिंग ग्रे ह्या एकांकीकेला ५०वे राज्य नाट्य महोत्सव, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजनाकाराचे पारितोषिक मिळाले.
कवी प्राजक्त यांची ग्रेवयार्ड लिटरेचर, मीरा, लालनाक्या ही ईपुस्तके प्रकाशित झाली आहे. शिवाय आता त्यांचा “we चार” ह्या काव्यवाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यांच्या काव्याला तरूण रसिकांचा उदंड प्रतिसाद आहे.
देवबाभळी या पुस्तकाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्राजक्त देशमुख हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेलं संगीत देवबाभळी हे नाटकही प्रसिद्ध झालं आणि लोकप्रिय ठरलं. दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार ३५ पेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या साहित्यकृतींसाठी देण्यात येतो. साहित्यिक प्राजक्त देशमुख हे साहित्य अकादमी पुरस्कार २०२० चे मानकरी ठरले आहेत.
या पुरस्कारासाठी तज्ज्ञांच्या त्रिसदस्यीय समितीने काम पाहिले. या समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबतच आशा बागे आणि लक्ष्मीकांत देशमुख या तज्ज्ञांनीही या पुरस्कारासाठी काम पाहिलं. प्राजक्त यांच्या देवबाभळी या पुस्तकाला आत्तापर्यंत ३९ पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारचा विजय तेंडुलकर पुरस्कारही प्राजक्त यांना मिळालेला आहे.
देवबाभळी या पुस्तकात तुकोबांना शोधत त्यांची पत्नी आवली भटकत असते, तेव्हा तिच्या पायात देवबाभळीचा काटा घुसतो आणि तिची शुद्ध हरपते. तेव्हा तिच्या पायातला काटा काढायला साक्षात विठ्ठल अवतरतो अशी एक वदंता आहे. त्या काट्याच्याच नावाचे हे नाटक विठ्ठलाने आवलीच्या पायातला काटा काढल्यानंतर काय घडले असेल याचा वेध घेते. विठ्ठल काटा काढून थांबत नाही. या जखमेचे निमित्त करून विठ्ठल रखमाईला आवलीची काळजी घ्यायला पाठवतो. दोन बायका एकत्र आल्या की गोंधळ उडतो; मात्र येथे या दोघी एकमेकींचा आणि पर्यायाने तुकारामांचा, विठ्ठलाचा, भक्तिपरंपरेचा वेध घेतात.
प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेल्या या नाटकात मराठी संस्कृतीचा स्वच्छ असा तळ आपल्याला दिसतो आणि संस्कृती म्हणजे काय आणि त्याची अभिरूची म्हणजे हे नाटक. आपली मराठी संस्कृती, वारकरी परंपरा तसेच मानवी नात्यांचं सुंदर वर्णन, बाईचं मन समजावून घेत हे नाटक पुढे जाते.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply