या अशा सांजवेळी,बाहुपाशी, घे जवळी,
रात्र उतरून आली खाली,
तुजविण जिवाची काहिली,
हुरहुरते मन अशा समयी,
तुझ्यासाठी,आंत तुटते काही
जीव कांतर कांतर होई,
आत्मा तरसे मिलनासाठी,
लौकिक सुखे भोवताली,
जीव कसा जळे त्यातही,
तरसवे मज विरहाग्नी,
तुझ्या शपथांची येतां स्मृती,
उले काळीज माझे किती,
तुला कल्पनाही नाही,
प्रेमाचीच लागे कसोटी,
ताटातुटीचीव्यथा ही,
कोरडेपण तुझे मजसी,
सारखे आत खात राही,
रुक्षतेचे तुझ्या काटे सलती,
टोच बोंच कशी कायम राही,
वरून वरून चित्रे देखणी,
नशीब फरांटे मारत राही,
घायाळ तनी बंबाळ मनी,
एकच छळे मज मूर्ती,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply