MENU
नवीन लेखन...

या देवी सर्व भूतेषु

आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली  ,अनेक भक्त आहेत.  अनेकांच्या या  ‘देवी ‘ कुलदैवता आहेत .

पुराणात शक्ती शिवाशी निगडित आहे . शिव स्थिर तर शक्ती चंचल ,प्रवाही ,सारखी रूपे बदलणारी !श्री मल्हारी मार्तंड आख्यानात एक संदर्भ आहे . श्री मार्तंड हे शिवाचे रूप , हे त्यांना पूर्ण माहित असते ,पण श्री म्हाळसेस ,ती पार्वतीचा अवतार आहे याचे विस्मरण झालेले असते . आदिशक्ती पार्वतीने अनेक जन्म घेतले ,तीच पार्वती ,तीच सीतेत होती ,तीच रमा ,तीच काली ,आणि तीच म्हाळसा ! प्रत्यक जन्मात शक्तीची नवी -नवी रूपे जगासमोर आली आहेत . तुम्ही म्हणाल हि झाली ‘पुराणातली वांगी ‘.  आजचे काय ? आजचे विज्ञान पण आपणास हेच सांगते . शक्ती म्हणजे Enargy ,कधीच नष्ट होत नाही , ती फक्त फॉर्म म्हणजे रूप बदलते ! नदीच्या प्रवाहातली शक्ती जनरेटर कार्यान्वित करून वीज होते , हीच वीज प्रकाश आणि उष्णता होऊन आपल्या घरात प्रकटते ! म्हणून या शक्तीचा  ‘आद्यन्तरहिता ‘ म्हणून उल्लेख होतो .

‘शक्ती’ बद्दल अजून एक संकल्पना मांडावीशी वाटते . ती सर्वव्यापी आहे . भद्राभद्रात ‘ती ‘ अडकत नाही , ‘ती ‘ ते वापरकर्त्यावर सोडते , ‘ती ‘ फक्त परिणाम ( म्हणजेच तिचा प्रताप )दाखून जाते ! जसे युद्धात ‘क्रूरता ‘ लागतेच मग ती राम करो वा  रावण ! भद्र -अभद्र , नैतिक -अनैतिक या सामाजिक कल्पना अस्तित्वात येण्याच्या कोट्यवधी वर्षा पासून ‘ती ‘ अस्तित्वात आहे ! साहजिकच ती या साऱ्या पासून मुक्त असणार .

चंडी पाठात या ‘आदिशक्ती ‘चीजी अनंत रूपे  आहेत,  त्यातील मोजक्या रूपानं त्रिवार वंदन करून कृतज्ञता व्यक्त करणारे ‘देवी सूक्त ‘ आहे . या रूपातील शक्ती  मानवास आदिशक्तीने प्रदान केल्या आहेत . तर ‘सर्वभूतेषु ‘ कोठे कोठे हि शक्ती वास करते याचा मागोवा घेऊ या . सुक्ताच्या सुरवातीस देवीची काही नामे घेऊन स्मरण केले आहे . सर्व नामावली गोड आणि सुंदर आहे . त्यातल्या त्यात मला भावलेली काही दिवीची सम्बोधने देतो . –दैवें ,शिवाये , भद्रायै,रौद्राये , गौरे , सुखाये , कल्याणे , सर्वकारिण्ये —–वगैरे . या नंतर ‘ती ‘च्या अस्तित्वाची रूपे येणे प्रमाणे .

१. या देवी सर्वभूतेषु विष्णूमायेति — विश्वाचे पालकत्व श्री विष्णू कडे मानले जाते . या ‘विष्णू मायेत ‘ सारे जग गुंतले आहे . सजीव निर्जीव ,तुम्ही -आम्ही सगळेच . मला ‘माया ‘या शब्दासाठी मराठीत प्रति शब्द आठवत नाही (तसे आम्ही जन्मजात शब्द -दरिद्री च )पण इंग्रजी ज्याला Ilussion -भासमान – म्हणतायेईल . हे एक त्या शक्तीचे रूप मानले आहे .

२. चेतनित्यभिदीयेत्ते –हि शक्ती म्हणजे आपल्यातील चेतना , सजगता . आपला ‘आत्मा ‘ हा या शक्तीचाच अंश . कदाचित ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी ‘ते याच अनुशंघाने म्हटले जात असावे . जे ‘पिंडा’त ते ब्रह्मांडात आहेच पण सगळे ब्रह्मांड पिंडात नाही . ‘आत्मा ‘ त्या ‘परमात्म्या ‘भिमुख करण्यालाच आत्मउन्नती म्हणतात . या दोनशक्ती एक झाल्या कि ‘मुक्ती ‘ मिळते .

३. बुद्धी रूपिणी –हि पण शक्ती स्वपरुपच . बुद्धी देवी सरस्वतीचे अधिष्ठान म्हणून ज्ञान हे तत्व सुद्धा येथ अपेक्षित आहे .

४. निद्रा रूपिणी — येथे फक्त निद्रा म्हणजे झोप नाहीतर ,’अज्ञान ‘हि अपेक्षित आहे . येथे अश्या सगळ्या गोष्टी येतात ज्यातून ‘जागे ‘व्हावे लागते .

५. क्षुदा रूपिणीन — क्षुदा म्हणजे भूक ,मग ती पोटाची असेल , आत्मज्ञानाची असेल ,न्यायाची असेल , संप्पती ,सत्तेची असेल सर्व येथे येते . अति भूक ‘हाव ‘होते ती सुद्धा येथेच .

६. छाया रूपिणीन — मराठीत ‘छाया ‘ म्हणजे सावली , इतरांची म्हणजे झाडाचं ,घराची तसेच आपली सुध्या पडते ती ,सुध्दा ‘छायाच . ‘छाया ‘ या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे . ‘कृपा छत्रा ‘च्या छाये प्रमाणे काही अभद्र छाया सुद्धा असतात .असो  ‘छाया ‘ रुपी शक्तीस वंदन करून पुढे सरकू .

७. शक्ती रूपिणीन — या रूपाचा आपण या पूर्वी बराच उहापोह केला आहे . या ‘शक्ती ‘ची एक गम्मत तुम्हास सांगतो , हि ‘अति सौम्य ‘ म्हणजे कोमल आहे तशीच ती भयानक ‘रॊद्राये ‘सुद्धा आहे . हि स्थूलात सौम्या असते ,पण ती जशी जशी सूक्ष्मांत सरकते तशी तशी ती रॊद्रा होत जाते . सूक्ष्मांत तीची दाहकता भयंकर होते ! (अणू बॉम्ब हे एकमेव उदाहरण पुरेसे आहे ,असे मला वाटते )

८. तृष्णा रूपिणीन –देहाला आवश्यक असणाऱ्या पाण्याची आठवण करून देणारी हि संवेदना , तहान .
हि ‘तहान ‘ कधी ज्ञानाची असेल तर कधी संपत्तीची . भौतिक ,आत्मिक ,अध्यात्मिक सर्व प्रकारच्या ‘तृष्णा ‘ शक्ती स्वरूपच . वंदन .

९. क्षांति रूपिणीन — आत्ता पर्यंत आलेली सर्व रूपे हि शक्तीची काहीशी बाहय देहाशी संबंधित होती . पण हि शक्ती ‘मनाशी ‘निगडित आहे . ‘क्षांति ‘ म्हणजे क्षमा ! हे एक ‘दान ‘ आहे आणि ‘वरदान ‘ सुद्धा आहे . कसे ? ‘क्षमा ‘ समर्थाची प्रभावळ आहे . जो शासन (दंड या अर्थी )करू शकतो त्याने ‘क्षमा ‘ केली तर ती शोभून दिसते , मोलाची ठरते . ज्याला क्षमा केली तो याचक ऋणी होतो . येथे हि शक्ती ‘दान ‘ ठरते . मग आपण सामान्यांनी काय करावे ?का आपल्या क्षमाशक्तीला धार नाही ? असे नाही ,धार आहे तर ! येथे याचकांसाठी नाही तर स्वतः साठी  क्षमा करायची आहे ! आपल्याच ‘ताण ‘निवारण्यासाठी ! हे वरदान नाही तर काय आहे ? आजच्या धकाधकीच्या तणावपूर्ण जीवनशैली साठी या सारखे वरदान नाही . वापरून पहा !

१०. जाती रूपानें — येथे सर्व जाती म्हणजे सजीव -निर्जीव , स्त्री -पुरुष ,उंच -बुटका ,काळा -गोरा जीव -जंतू आले .

११. लज्जा रूपिणीन — ‘लाज ‘ पुन्हा मानसिक छटा असलेली शक्ती . येथे रूढ अर्थाच्या ‘लज्जे ‘ सोबत विनम्रता (Modesty )पण अपेक्षित आहे .

१२. शांती रूपिणीन — हि सुद्धा एक शक्ती आहे . मनःशांती सामान्या पासून ते सन्याश्यापर्यंत सर्वाना हवी असते ,त्या शिवाय आत्मसंवाद साधता येत नाही . आणि या सवादा  साठी वातावरणातील शांती पण हवी .

१३. श्रद्धा रूपिणीन — जगण्यासाठी श्रद्धा हवी असते . स्वतःवर असेल ,इतरांवर असेल , देवावर असेल ,दैवावर असेल ,नायतर कर्मावर असेल . खूप जण ‘देव ‘हि संकल्पना मनात नाहीत, पण ‘त्या जगत पालक ‘शक्तीवर मात्र विश्वास असल्याचे मान्य करतात !

१४. कांती रूपिणीन –म्हणजे तेज तसेच ‘भव्यता ‘ हि येथे अभिप्रेत आहे .

१५. लक्ष्मी रूपिणीन — या रूपाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही ,कधी नोव्हे ते जग या रूपाचे दिवाने झाले आहे . खरेतर या ‘लक्ष्मीची ‘ओळख आपल्याला करून घेणे गरजेचे आहे . येथे फक्त पैसे ,स्थावर ,जंगम मालमत्ता अपेक्षित नाही तर प्रगती अपेक्षित आहे . केवळ सधनता नाही तर ‘समृद्धी ‘ अपेक्षित आहे ! अर्थात मनाची समृद्धी सुद्धा यात आलीच .!

१६. वृत्ती रूपिणीन –हि पण मानसिकता . ‘नियत चांगली ठेवावी ‘ ‘नियतमे खोट है ‘ यातली ‘नियत ‘ म्हणजे वृत्ती . थोडक्यात आपला Attitude .

१७. स्मृती रूपिणीन –हि एक महत्वाची शक्ती आहे . मिळालेले ज्ञान जतन करणारी शक्ती . जेव्हा हि ऋणावस्थेत (-)जाते तेव्हा ,विस्मरण होते . स्मरण असो कि विस्मरण प्रसंगानुरूप वरदान किंवा शाप ठरते .

१८. दया रूपिणीन — हि पण एक मनाशी निगडित शक्ती . क्षमे प्रमाणेच हि पण एक ‘ दान ‘आहे . आणि कोणतेही दान करताना ते ‘ सतपात्री असावे ‘ हे प्रावधान येथेहि पाळावे लागते .

१९. तुष्टी रूपिणीन — हि पण एक मानसिकता आहे . आजच्या जगण्यातला एक हरवत चाललेला एलिमेंट . आज आपण ‘पैसा ‘कमावण्यात ‘(बरेचशे ‘मिळवण्यात ‘)मश्गुल आहोत .  पैसा कमावणे गैर किंवा वाईट नाही .फक्त   मिळालेला पैसा आणि त्यातून मिळणारे समाधान याची सांगड घातली जात नाही . ‘पैसा ‘ हे केवळ एक ‘साधन ‘ आहे हेच आपण विसरतोय . या ‘साधना’लाच आपण ‘साध्य ‘करून टाकलाय ! जेथे पैसा आणि त्यातून मिळणारे समाधान याचा समायोजन बिंदू असतो तेथे हि ‘तुष्टी ‘ वास करते ! तुष्टीची एक लिटमस टेस्ट सांगतो . तुष्टीत झालेल्या कष्टाचा थकवा नसतो आणि अधिकाची हाव हि नसते . Just Enough . अशी अवस्था असते . या शक्तीस ओळखा ,प्राप्त करा अन नमन करा .

२०. मातृ रूपिणीन — वॉट्सप ,फेसबुकच्या या जमान्यात मातृत्वाच्या पोस्टाची ‘सुमनी ‘ आलीयय ! वाईट याचे वाटते कि पोष्ट करणाऱ्याला ‘आई ‘पेक्ष्या पोष्टच्या ‘LIKE ‘चीच ज्यास्त हाव असते . ” म्हातारी मेली उपाशी अन चौदाव्याला केली लापशी “असला प्रकार झालाय !जन्मदात्रीला जिवंतपणीच एकाने मसणवट्यात आणून सोडले !पिंडाचे मुटके खाऊन जगतेय ! ज्या रात्री हि बातमी TV वर पहिली ,खरे सांगतो झोप अली नाही . असो कोणास हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाहीय .
येथे ‘मातृ ‘त्व केवळ माते साठीच नाही तर ‘सृजनता ‘या अर्थी योजिले आहे . ‘सृजनात ‘ नवं निर्मिती , सर्व कला कृती आल्या . त्यामुळे एखाद्या कवितेचा कवी किंवा चित्राचा चित्रकार सुद्धा ‘मातृ ‘रूपच !हे ‘ मातृ ‘रूप खूप व्यापक आहे ,मी तोकडा पडतोय !क्षमस्व . या मातृ रूपास विनम्र त्रिवार वंदन .

२१. भ्रांती रूपिणीन — भ्रांती म्हणजे भ्रम ,यात सत्यासत्य ,चूक बरोबर काहीच माहित नसते . पण जेव्हा सत्याची जाण होते तेव्हा , भ्रमितचा भ्रम निवळतो . तोवर तो भ्रमासच सत्य समजत असतो . पण जेव्हा भ्रमातली चूक उमगते तेव्हा ती दुरुस्त करावी , झाल्या क्षतीची भरपाई करावी आणि जर भरपाई करता येत नसेल तर किमान ‘क्षमा ‘याचना करावी हे अपेक्षित आहे .

या सूक्तांच्या बाबतीत मला नेहमीच कौतुक वाटते ते हि सूक्ते रचणाऱ्या कवींचे . ह्या विदुषी एकी कडे ज्ञान घडे रिते करतात तर दुसरीकडे सुरसता पण टिकवतात ! मला फारसे संस्कृत कळत नाही , पण हे स्तोत्र वाचताना एक गेय लय तर सापडतेच ,आणि कोमल गोडवा पण जाणवतो .

दुसरे कौतुक याचे वाटते कि या स्तोत्र -सूक्तांना ती रचणाऱ्या कवीचे नाव नाही ! नाहीतर आम्ही पांचट चारोळी खाली सुद्धा ——असो . (अहो यात अस्मादिक सुद्धा आले , शेवटी आपण सामान्यच . ) या विद्वानांना श्रेयाची हाव नव्हती हेच खरे . मला हे स्तोत्र रोज  गाऊन /म्हणून  काय मिळते ? मनाला शांती , स्थिरता ,बुद्धीला खाद्य ! फक्त काही मिनिटात ! वर ‘मातेचा ‘आशिष !

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय , पुन्हा भेटूच . Bye  .

आदि शक्तीचे स्तवन

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..