या कातरल्या क्षणांना,
सय तुझी येते,–
उन्हाची तप्त काहिली,
चटकन् दूर होते,
वारा धुंद वाही,
ढग जाती प्रवासी,
अधूनमधून बिजलीही,
उगा आपुले दर्शन देई,
अशा वेळी आठवे मज,
सोनेरी प्रभेची सांज,
याच समुद्रकिनारी,
वाजली मिलनाची गाज,
नभ सुंदर सोनबावरे,
होते भेटीस साक्षी,
कूजन करीत बागडती,
पक्षी आनंदें वृक्षी,
किनारा दूरवर तटस्थ,
उभ्याने राखी सागराला,
मिलनाची किती उदाहरणे,
ठेवून समोरी चंद्राला,—!!!
या मंतरलेल्या क्षणांना,
आठवे चांदणी उगवती,
प्रेमाखातर सुधाकराच्या,
नशेत त्या नाचती -गाती,
तिच्यावर चढली धुंदी,
आजही मज नीट स्मरे,
इकडे धरणीवर खाली,
कुणी प्रेमवीर गात फिरे,
अशी चांदणी नाचती-गाती,
इथेच त्याला ओढत आणी,
खळाळूंन उत्तेजित होई,
निळ्याशांर लाटांचे पाणी,–!!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply