वाचायलाच हवी अशी एक कथा … ठुसठुसणाऱ्या वेदनेला मुखरित करणारी कथा…
अकल्पित
” कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून , रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला.
” अहो पण मी त्यातला नाही . ” त्यानं बाजू मांडायचा प्रयत्न केला. पण गावकरी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.
“आमचा बाजार मांडताय जगासमोर. तुम्ही इथली वाताहात दाखवत आहात . फुटलेल्या धरणाची चित्रं दाखवत आहात. पण मोडलेले संसार , उद्ध्वस्त झालेली शेती आणि पुरात वाहून गेलेले आमचे गावकरी परत कसे मिळणार याबद्दल कुणी काही बोलत नाही. धरणफुटीला जबाबदार कोण हे शोधत नाही तुम्ही.”
” हो. आणि हे *डवे करतात काय , तर , आमच्या नकळत आमच्यातल्या काहींचे चेहरे टिपतात आणि न्यूज काय करतात.’ फुटलेल्या धरणातल्या पाण्यानं , इथल्या माणसांचे अश्रू वाहून नेले .’ … अश्रू वाहून नेले? कुणी सांगितलं तुम्हाला? काय वाट्टेल ते शब्द काय वापरता तुम्ही? म्हणे धरणातल्या पाण्यानं देवाला पण सोडलं नाही. ते पण वाहून गेले. कुणी सांगितलं हे. कुणी केली ही बातमी? मंदिर वाहून गेलं असलं तरी देव जाग्यावर आहे , तोच आमचा आधार आहे. तुमचे नेते आमच्यासाठी काय करतात ते सांगा जगाला. आहे हिम्मत? ‘
बोलणारा अंगावर धावून आला. त्याला काय बोलावं कळेना. तो गावकऱ्यांचा उद्रेक बघत राहिला.
सभोवतालची परिस्थिती पाहवत नव्हती. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं. दृश्य विदारक होतं. भयंकर होतं. सगळीकडे चिखल दिसत होता आणि बचावलेले गावकरी , डोळ्यातून अखंड वाहणारं पाणी आवरीत आप्तेष्टांच्या देहांचा शोध घेत होते. सगळीकडे वाहून गेलेल्या संसाराच्या खुणा दिसत होत्या…
फुटलेले धरण , तुटलेले संसार आणि मनाचे सुटलेले बांध … धरण फुटल्यानंतर गावाच्या , गावकऱ्यांच्या वाताहातीची करुण कहाणी …
अकल्पित
लेखक : डॉ. श्रीकृष्ण जोशी
येत्या दिवाळीत… प्रपंच दीपावली २०२० मध्ये.
वाचायलाच हवी अशी , कोकणच्या पार्श्वभूमीवरील,
अकल्पित कहाणी .
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
खूप छान