नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग १४

 

न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

वाग्भट सूत्रस्थान 5-5/6 भाग दोन

सूर्य, इंदु म्हणजे चंद्र आणि पवन म्हणजे वारा यांची दृष्टी न पडलेल्या पाण्याची घनता वाढल्यामुळे असे पाणी पचायला जड होते. तसेच अशा पाण्यामध्ये, दुसऱ्या पदार्थात चिकटपणा निर्माण करण्याची क्षमता अधिक वाढते.

शास्त्रकारांनी मूळ सिद्धांत त्या काळी सांगून ठेवला. तोच सिद्धांत आजच्या काळात वापरायचा झाल्यास प्रत्येक शब्दाची उकल करणे आवश्यक आहे.

पावसाची वृष्टी होत असताना, अंतरीक्षातून जमिनीवर येणाऱ्या पाण्याला, जलाशयात पोहोचेपर्यंत, सूर्याचे किरण स्पर्श करीत नाहीत, अथवा त्या पाण्याला चंद्रप्रकाश लागत नाही, किंवा या पाण्यावरून वारा कधी वाहिलेला नाही. अश्या घनदाट, निबिड काळोख्या जंगलाच्या ठिकाणी असलेले पाणी अस्वस्थ करणारे असते.

साहित्यिक भाषेत सांगायचे झाल्यास , असे घनदाट जंगल, ज्यात सूर्य म्हणजे काय हे फक्त वरच्या कोवळ्या पालवीलाच माहिती असते. अशा तेजस्वी सूर्याचे वर्णन जेव्हा खालील फांद्यांना समजते तेव्हा, त्या देखील सूर्याचे दर्शन घ्यायला वरवर येऊ लागतात, पण त्यांना वर यायला जागाच नसल्याने जमिनीवर मात्र किरणाचा एखादा कवडसाही पडत नाही. सुर्याला जर खाली पोचता येत नसेल तर, चंद्राची काय बात ? ती सतत चंद्र सूर्यासाठी आसूसलेलीच रहाते.
चंद्रमा म्हणतो, हे सूर्या, तू नसण्यामुळे रात्र तर माझीच असते, पण दिवसाही तुझे अस्तित्वच न कळल्यामुळे, जमिनीवर फक्त काळोखाचेच साम्राज्य असते. त्या बिचाऱ्या जमिनीला तर दिवस म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही.

ती जमिन म्हणते, माझी मीच सतत एकटी असते. मग दिवस काय आणि रात्र काय मला सगळं सारखंच ! तुम्हीच काय, वारादेखील माझ्याबरोबर येत नाही. ……
मै और मेरी तनहाई, दुसरा और कोई नही ।
किती अस्वस्थता ही !
एखाद्या विरहणीची ही आर्तताच, शास्त्रकारानी जणुकाही जलबद्ध केली आहे.

असो !

आजच्या भाषेत, सूर्य, चंद्र आणि वारा यांनी न बघितलेलं पाणी म्हणजे एअरटाईट विदाऊट सनलाईट इन कोल्ड प्लेस

हीच जंगली अवस्था आजच्या काळात, आपल्या घरातील फ्रिजमध्ये असते काहो, उद्यापर्यत विचार करा !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
21.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..