नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग २७

पाणी शुद्धीकरण भाग सात

आपण मागे बघितले की ज्या नद्या खळाळत वाहातात, त्यांचे पाणी संथ वाहाणाऱ्या नदीच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असते.

हे मूळ सूत्र ग्रंथकारांनी सांगितले. आता याच सूत्राने आपल्याला पाणी शुद्ध करता येईल का ?
ज्या नद्यांचे पाणी मोठाल्या दगडावर आपटत खाली येते, उंचावरून खाली पडते, तुषार उडवणारे असते, जोरात वाहाणारे असते, ते जर शुद्ध होते, तर पाणी शुद्ध करण्यासाठी हीच पद्धत वापरता येईल.

म्हणजेच पाण्याला घुसळून वापरणे..
दह्याचे ताक करताना जसे घुसळले जाते, तसे पाणी घुसळले तर त्यातील अशुद्धी खाली बसतात. त्यातील सूक्ष्म जीव नष्ट होतात, आणि पाणी शुद्ध होते.
दही घुसळताना जी शक्ती वापरली जाते, त्या शक्तीच्या सहाय्याने दह्यातील सूक्ष्मत्व वेगळे होत जाते. त्यातील लोण्याचा घन भाग एकत्र येत जातो आणि वर तरंगतो, तसेच पाणी घुसळले गेल्यावर त्यातील अशुद्ध द्रव्याचा घनभाग एकत्र येतो आणि तळात एकत्रित होतो.

या प्रक्रियेत आणखी एक फायदा असा होतो, तो म्हणजे वातावरणातील प्राणशक्ती पाण्यात जास्त प्रमाणात मिसळली जाते. आणि पाण्यातील अतिरिक्त वायु महाभूत निघून जाते.

एखादे द्रव्य महाभूतांचा विचार करता पांचभौतिकच असते. फक्त तरतम भावांचा विचार करता, प्रत्येक द्रव्यातील संघात वेगवेगळा होतो, त्यावर ते द्रव्य घन वायु द्रव आकाशीय, तेजस बनणे अवलंबून असते.
तसे पाण्यात असलेला घन, वायु आणि आकाशीय भाग कमी करत गेला की शुद्ध जल महाभूताकडे आपण जातो. आपल्याला जे द्रव्य ज्या स्वरूपात हवे आहे, ते महाभूत त्यामधे शिल्लक ठेवून अन्य महाभूतांचे प्रमाण कमी करीत जाणे. हीच खरी शुद्धी.

हाच नियम कुठेही वापरू शकतो. अगदी सोन्याच्या बाबतीतही. मग सोन्यातील अन्य महाभूते कमी करत सोन्यातील फक्त शुद्ध पृथ्वी महाभूत शिल्लक ठेवण्यासाठी जे संस्कार सोन्यावर केले जातात, ती सोन्याची शुद्धी !

उंचावरून खाली पडणारे पाणी शुद्ध असते. थोडसं संयुक्तिक वाटणार नाही पण समजण्यासाठी सांगतो, चहा “चढवला” कि त्याची चव बदलते ना ? चढवणे म्हणजे लांऽऽब करणे. उंचावरून खाली ओतणे, या उंचावरून ओतण्यामुळे त्यातील घन द्रवता बदलत जाते.चहाची चवही बदलते. तसेच आहे. पाणी उंचावरून ओतून घुसळण्याच्या प्रक्रियेतून अशुद्ध द्रव्ये घनीभूत होतात. नंतर ती गाळून वेगळी करता येतील.

घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी मिक्सरमधून काही काळ फिरवून बघा. वेळ असेल तर ताकाच्या रविने घुसळा…
रविचे घुसळणे आणि मिक्सरमधून घुसळणे यातही खूप फरक आहे, पण पाणी घुसळून पहा तर खरं, पाण्यातील अशुद्धी कश्या तळात जमा होतात त्या !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021

03.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..