नवीन लेखन...

याला जीवन ऐसे नाव भाग ३०

पाणी शुद्धीकरण भाग दहा

ज्या भागातील पाणी पचायला खूप जड असते, अशा भागात पाणी खूप उकळावे लागते. एक सोळांश करावे. देश ऋतु, रोग यानुसार पाण्याची शुद्धी किती करायची हे ठरवून पाणी एक अष्टमांश, एक चतुर्थांश, किंवा तीन भागातील एक भाग आटवून दोन शिल्लक ठेवावे, वा निम्मे आटवावे.
या प्रकारे शुद्ध केलेले पाणी वेगवेगळ्या गुणाचे असते.

पाणी आटवत असताना त्या फेस आला तर समजावे त्यात अशुद्धी आहेत. त्या अशुद्धी जाईपर्यंत म्हणजे फेस नष्ट होईपर्यंत पाणी उकळावे.

पाणी उकळून गाळून लगेच गरम गरम प्यायल्याने पचनशक्ती लगेचच सुधारते. आम नाहीसा होतो. म्हणून असे पाणी पिणे, हे कफामुळे होणारे अजीर्ण आणि वाता मुळे होणाऱ्या अजीर्णावरील मुख्य औषध आहे.

केवळ याच दोन आजारात तहान लागली नसेल तरीदेखील असे गरम पाणी सांगितले आहे. पण ते देखील एवढेच प्यावे की खाल्लेल्या अन्नाचा पोटात ओलसर गोळा होईल. त्यापेक्षा जास्ती पाणी क्लेद म्हणजे चिकटपणा निर्माण करते.

दगड, लाख, कोळसा, गारगोटी, सोन्या चांदीचा गोळा, ( किंवा असेल बिस्कीट पण चालेल.) लाल होईपर्यंत तापवून त्या पाण्यात विझवली तरी देखील पाणी शुद्ध तर होतेच पण या द्रव्यांचे गुणधर्म पण पाण्यात येतात.

गर्भिणीला डोहाळे काळातील उलटी थांबत नसेल तर मातीचे घट्ट ढेकुळ किंवा मातीचा गोळा, लाल होईपर्यंत तापवून पाण्यात विझवावा. ते पाणी गाळून तिला चमचा चमचा द्यावे. खूप फायदा होतो.

लहानपणी लोखंडी पळीत फोडणी करून ती ताकावर ओततानाचा आणि नंतर ती पळी ताकात बुडवतानाचा चुर्रऽऽऽऽ हा आवाज ऐकायला किती मज्जा यायची नं ! धावत स्वयंपाकघरात यायचो.

या लोखंडी पळीतील लोखंडाचा औषधी अंश फोडणीतून ताकात कधी आणि कसा उतरायचा, हे आजीला आणि आईला पण कधी कळलेच नसेल…..

“फोडणी” ही फक्त भारतातच ! पाश्चात्य तंत्रात फोडणी कुठली नि कुठलं काय. त्यांचे मुख्य अन्न काय तर शिळा पाव त्यात मासाचा तुकडा किंवा शिळ्या मासाचा तुकडा आणि त्याच्याबाहेर पाव ! आत्ता आत्ता त्यांना समजतंय कोशिंबीर वगैरे खावी ते ! रोजच्या रोज जेवण बनवणं, विविध चविष्ट प्रकार बनवणं, आणि मुख्य म्हणजे सर्व आरोग्यदायी बनवणं हे फक्त आजी नि आईच करू शकते. मम्मी नाही. जाऊदे, मोठा विषय नंतर येईल चर्चेला….

उकळून गार झालेले पाणी (शृतशीत जल ) परतपरत गरम करू नये. ते नीट झाकून ठेऊन, दिवसभरात संपवावे. परत गरम केले तर त्यातील औषधी गुण संपतात. तसेच हे पाणी रात्र उलटून गेली तर हे पाणी नंतर पित्तासह अन्य दोषांना वाढवणारे होते. अजिबात वापरू नये.

पाण्याच्या शुद्धिकरणाचे एवढे सखोल आणि शास्त्रीय ज्ञान देणारा आयुर्वेद शासन स्तरावर मात्र दुर्लक्षिला जातोय, आणि सामान्यापर्यंत पोचतोय तो विकृत पाश्चात्य स्वरूपात.

भगिरथाने तप करून पृथ्वीवर आणलेली ही “गंगा” ही शुद्ध होती, तिला आम्ही वैद्यच शुद्ध करणार, त्यात मिसळलेली पाश्चात्य तंत्राची भेसळ, आम्हीच भगिरथाचे वंशज, काढून टाकणार !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021

06.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..