नवीन लेखन...

यादवी माजवण्याचा प्रयत्न हाणून पाडा

गरीब, शेतकरी वा दुकानदारांच्या त्रासाचा मुखवटा घेऊन जनतेला उचकवणारे नेते पुष्कळ आहेत.तर्खडकरांच्या दुस-या भाषांतर मालेतील आम्हाला एक वाक्य ‘ Y ‘च्या जागी ‘ I ‘ केव्हा येतो हे व्याकरणात शिकवले जात असे .”GOOD CITIZENS ARE REJOICING AND THE BAD ARE WEEPING “.देशात तंतोतंत असेच चालले आहे.

मायावती आणि मुलायम यांच्याकडे तर बेहिशोबी मालमत्ता असल्याची जुनी प्रकरणे आहेत. राहिले केजरीवाल! त्यांनी तर कोट्यवधी रुपये वर्गणीतून गोळा केल्याचे दावे वारंवार केलेले आहेत. नेमक्या अशाच लोकांना नोटा रद्द झाल्याची इतकी पोटदुखी कशाला? राहुल गांधी यांना लायनीत उभे राहून नाटक करण्याची गरज काय ? लोकांच्या सहन शीलतेचा अंत पाहू नका !!! आता क्रांती होईल ती राज्य कर्त्यांच्या विरोधात न होता राज्य कर्त्यांच्या विरोधात असणा-या लोकांच्या विरोधात असेल.लोकांना मूर्ख समजण्याचा मूर्खपणा करू नका.

काही सरकारी बाबू आणि बँकेतील उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा नोटा बदलण्याचा व्यवहार पंतप्रधानांच्या अंगलट कसा येईल हाच प्रयत्न करीत आहेत.त्यांचे प्रयत्न हाणून पाडा. आणखी काही दिवसात प्रचंड काळे पैसे मातीमोल होणार आहेत.देशातल्या प्रत्येक नागरिकाने स्वतः नरेंद्र मोदी आहोत असे समजले पाहिजे.मोदींना कोट्यवधी हातांचे बळ दिले पाहिजे.

देश बदलतोय त्याची सुरवात स्वतः बदलून करा.

चिंतामणी कारखानीस

14 Nov 2016

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..